ETV Bharat / sports

शस्त्रक्रियेनंतर डेव्हिड वॉर्नरचे पुनरागमन, साकारली शतकी खेळी

या सामन्यात पेनरिथने प्रथम फलंदाजी करताना ३१४ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना रेंडविकचा संघ २१९ धावांवर सर्वबाद झाला.

डेव्हिड वॉर्नर
author img

By

Published : Mar 10, 2019, 7:37 PM IST

सिडनी - डेव्हिड वॉर्नरची यूएईमध्ये पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात निवड करण्यात आलेली नाही. नुकतेच त्याने क्लब क्रिकेट खेळताना शतक झळकावले. वॉर्नरच्या हाताच्या कोपऱ्याची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्याचे बोलले जात आहे.

वॉर्नरने सिडनीतील क्लबकडून खेळताना ७७ चेंडूत ११० धावांची खेळी केली होती. त्यात ७ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. वॉर्नरच्या खेळीनंतरही त्याच्या रेंडविक संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. वॉर्नरला १८ वर्षांच्या हेनरी रेल्जने झेलबाद केले.

या सामन्यात पेनरिथने प्रथम फलंदाजी करताना ३१४ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना रेंडविकचा संघ २१९ धावांवर सर्वबाद झाला.

वॉर्नरने चेंडूशी छेडछाड केल्यानंतर दोषी आढळल्याने त्याच्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक वर्षाची बंदी घातली होती. ही बंदी २८ मार्च रोजी समाप्त होणार आहे. शुक्रवारी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा करण्यात आली. वॉर्नर अखेरच्या २ सामन्यांत खेळण्यास पात्र होता, तरीही त्याला संधी देण्यात आली नाही.

Intro:Body:

david warner smashes century on return from elbow surgery

Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

david warner
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.