ETV Bharat / sports

Video : शिखर धवनची 'ती' अवस्था पाहून, सायना नेहवालसह क्रिकेटपटूंकडून सांत्वन

शिखरची अवस्था पाहून भारताची फुलराणी सायना नेहवाल हिच्यासह ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर, अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी आणि सनरायझर्स हैदराबादचा श्रीवत्स गोस्वामी यांनी त्याचं सांत्वन केलं आहे.

david warner mohammad nabi saina nehwal on shikhar dhawan video
Video : शिखर धवनची 'ती' अवस्था पाहून, सायना नेहवालसह क्रिकेटपटूंकडून सांत्वन
author img

By

Published : Mar 25, 2020, 1:29 PM IST

मुंबई - कोरोनामुळे देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे घरात असलेल्या भारताचा डावखुरा सलामीवीर शिखर धवनला तिची पत्नी आयेशाने धुणी-भांडी करण्यासं लावलं. एवढेच नव्हे तर शिखरला टॉयलेटही स्वच्छ करावं लागलं. याचा व्हिडिओ शिखरने आपल्या सोशल मीडियावरुन अकाउंटवरुन शेअर केला होता. शिखरची ही अवस्था पाहून भारताची फुलराणी सायना नेहवाल हिच्यासह ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर, अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी, पाकिस्तानचा शोएब मलिक आणि सनरायझर्स हैदराबादचा श्रीवत्स गोस्वामी यांनी त्याचं सांत्वन केलं आहे.

काय आहे शिखरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये -

शिखरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, तिची बायको आयेशा ही आरशासमोर मेकअप करताना दिसत आहे. तर शिखर हा बाथटबमध्ये बसून कपडे धूत आहे. याशिवाय शिखर घरातील कमोड साफ करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊडला 'जब से हुई है शादी, आफत गले पडी है, गाणे वाजत आहे. या व्हिडिओला त्याने 'एक आठवडा घरी थांबल्यानंतर ही अवस्था.. झाल्याचे, मजेशीर कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान, शिखरचा हा व्हिडिओ सोशल मीडिया चांगलाच व्हायरल झाला. यानंतर सायना नेहवाल, डेव्हिड वॉर्नर, मोहम्मद नबी आणि श्रीवत्स गोस्वामी यांनी सांत्वन केलं आहे.

  • 😂😂👌

    — Saina Nehwal (@NSaina) March 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • 🤣🤣🤣

    — Mohammad Nabi (@MohammadNabi007) March 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • 😂😂😂😂😂😂😂

    — Shreevats goswami (@shreevats1) March 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • But that’s you pre-isolation too, so what’s the deal here??!!
    😅
    😂
    🤣

    — Shoaib Malik 🇵🇰 (@realshoaibmalik) March 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, कोरोनाने जगभरात थैमान घातले असून दिवसेंदिवस याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. आजघडीपर्यंत कोरोनामुळे १९ हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर ४ लाखांहून अधिक लोकांना यांची लागण झाली आहे. भारतातही कोरोनाचे ५०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर देशात ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता, मंगळवार रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाउन केलं जात आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

हेही वाचा - Corona Virus : BCCI म्हणते.. 'घरीच थांबा; आमची करडी नजर आहे'

हेही वाचा - COVID-१९ : २००७ विश्वकरंडकाचा 'हिरो' कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी उतरला रस्त्यावर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.