जोहान्सबर्ग - कोरोना व्हायरसने जगभरात धूमाकुळ घातला आहे. या व्हायरसचा शिरकाव क्रीडा क्षेत्रातही झाला असून अनेक स्पर्धा स्थगित झाल्या आहेत. अनेक क्रीडापटूही आपल्या घरीच वेळ घालवत आहेत. दरम्यान, या व्हायरसवर खबरदारीचा उपाय म्हणून आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने त्याला कोणासोबत एकांतवासात राहायला आवडेल याचे उत्तर दिले आहे.
हेही वाचा - 'कोरोनाची भीती वाटते? भिऊ नका क्रिकेट खेळायला आमच्याकडे या'
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डी कॉकसोबत मला वेळ घालवायला आवडेल, असे मत स्टेनने दिले आहे. 'तो जगातील माझ्या आवडत्या लोकांपैकी एक आहे. जर तुम्ही त्याच्या घरात गेलात तर तो एकतर मासेमारीची तयारी करत असेल किंवा स्वयंपाकाचा व्हिडिओ पहात असेल. मला स्वयंपाक करायला आवडत नाही. परंतू डी कॉकला स्वयंपाक करायला आवडतो. त्यामुळे मी त्याच्यासोबत राहू शकतो', असे स्टेन म्हणाला.
आयपीएलही पुढे -
बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेला १५ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे. यापूर्वी ही स्पर्धा २९ मार्चपासून सुरू होणार होती. कोरोनो व्हायरसमुळे आयपीएलचा १३ वा हंगाम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.