नवी दिल्ली - कोरोना व्हायरसमुळे भारतीय क्रिकेटपटूंना मिळालेला ब्रेक उत्तम असल्याचे मत भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मांडले आहे. या ब्रेकमध्ये भारतीय खेळाडू स्वत:ला तंदुरुस्त ठेऊ शकतात, असेही शास्त्री यांनी म्हटले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक व्यस्त होते. न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघाने पाच टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळले. गेल्या वर्षी झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर, भारतीय संघाने विंडीज, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचा दौरा केला होता.
शास्त्रींनी सध्या लोकांनी जागरूकता दाखवावी असे म्हटले आहे. ‘यावेळी क्रिकेटला प्राधान्य नाही. विराटने संदेश दिला आहे. इतरही देत आहेत. त्यांना माहित आहे की ही बाब गंभीर आहे आणि सध्या क्रिकेट आवश्यक नाही’, असेही शास्त्री म्हणाले.