शारजाह - आयपीएलच्या ४१व्या सामन्यात मुंबईने चेन्नईचा १० गडी राखून धुव्वा उडवला. या मानहानीकारक पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ''या मोसमात संघ ज्या पद्धतीने खेळला, तो गुणतालिकेत शेवटी असण्याच्या पात्रतेचा आहे'', असे फ्लेमिंगने सांगितले. आयपीएलच्या इतिहासात चेन्नईने प्रथमच असा पराभव पत्करला आहे.
सामना संपल्यानंतर फ्लेमिंग म्हणाला, ''हा एक अतिशय निराशाजनक आणि आश्चर्यकारक हंगाम आहे. बर्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतू आम्ही चांगले प्रदर्शन करू शकलो नाही. हंगाम सुरू होण्यापूर्वी खेळाडू गमावणे, एकापेक्षा जास्त षटके मिळवणे किंवा अनेक विकेट गमावणे. हे एखाद्या संघाकडून होऊ शकते. त्यामुळे पॉइंट टेबलमधील आमची स्थिती बहुधा बरोबर आहे."
मुंबईविरुद्धच्या सामन्यात पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये चेन्नईने २४ धावांत ५ बळी गमावले. आयपीएलच्या इतिहासात चेन्नईने प्रथमच पॉवरप्लेमध्ये ५ बळी गमावले. फ्लेमिंग म्हणाला, "हा आतापर्यंतचा सर्वात वाईट पॉवरप्ले होता. इतक्या लवकर फलंदाज गमावल्यामुळे आमच्यासाठी पॉवरप्लेमध्येच सामना संपला. त्या प्रकारची फलंदाजी पाहणे फार कठीण होते. आमच्या संघात असे काही तरुण खेळाडू होते, ज्यांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी होती. पण काही झाले नाही."
आयपीएलचा १३वा हंगाम चेन्नईसाठी खूपच आव्हानात्मक होता. चेन्नईने ११ सामन्यांपैकी केवळ ३ सामने जिंकले आहेत.