मुंबई - कोरोना व्हायरसमुळे येत्या काही वर्षांत क्रिकेटमध्ये बरेच बदल दिसू शकतात. कोरोनानंतर क्रिकेटपटूंना आपल्या सवयी बदलाव्या लागणार आहेत. उदाहरणार्थ, त्यांना सराव दरम्यान शौचालयात जाण्याची परवानगी नाही. तसेच, खेळाडूंना त्यांची टोपी किंवा सनग्लासेस ऑन फील्ड पंचांना देता येणार नाही.
सामन्यापूर्वी आणि नंतर खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये कमी वेळ घालवावा, अशी आयसीसीची इच्छा आहे. आयसीसी क्रिकेट समितीने यापूर्वीच चेंडूवर लाळ लावण्यास बंदी घालण्याची शिफारस केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मार्गदर्शक सूचनांनुसार, खेळाडू आपले वैयक्तिक सामान टोपी, टॉवेल्स, सनग्लासेस, जंपर्स इत्यादी पंच किंवा संघातील खेळाडूंकडे सोपवू शकत नाहीत. त्यांना शारीरिक अंतर राखता आले पाहिजे.
परंतू खेळाडूंचे सामान कोण ठेवेल, हे स्पष्ट झालेले नाही. इतकेच नव्हे तर पंचांना चेडूं पकडताना मोजेही वापरावे लागतात. हेल्मेट्स प्रमाणेच खेळाडू आपले सामान आणि सनग्लासेस मैदानावर ठेवू शकत नाहीत.