नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचे अष्टपैलू खेळाडू हार्दिक आणि कृणाल पांड्या यांचे वडील हिमांशू पांड्या यांचे आज सकाळी निधन झाले आहे. हार्दिकसह क्रुणाल बडोदा संघाला सोडून घरी परतला आहे. कृणाल सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफी स्पर्धेत बडोदा संघाचे नेतृत्व करत होता. आता तो उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे.
हेही वाचा - पदार्पणाच्या सामन्यात सुंदर आणि नटराजनचा खास कारनामा
बडोदा क्रिकेट असोसिएशनचे (बीसीए) मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर हट्टंगडी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले ''हो. कृणाल पांड्या बायो-बबलच्या बाहेर गेला आहे. हे एक वैयक्तिक नुकसान आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशन हार्दिक आणि कृणालच्या दु: खाच्या सहभागी आहेत.''
सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत कृणालने ३ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ४ बळी घेतले. उत्तराखंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कृणालने ७६ धावा फटकावल्या होत्या. तिन्ही सामने जिंकून बडोदाने ग्रुप सीमध्ये अव्वल स्थान मिळविले.