ETV Bharat / sports

आपल्या ३४व्या वाढदिवसानिमित्त सुरेश रैना करणार 'मोठं' काम - raina to help children on birthday

डावखुरा फलंदाज सुरेश रैना हा उपक्रम गार्सिया रैना फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने सुरू करणार आहे. फाउंडेशन अमिताभ शाह यांच्या सहकार्याने काम करेल. या उपक्रमाच्या माध्यमातून या शाळांमध्ये शिकणार्‍या १०, ०००हून अधिक मुलांना आरोग्य आणि स्वच्छतेच्या सुविधा मिळतील.

cricketer suresh raina to help children in 34 schools on his 34th birthday
आपल्या ३४व्या वाढदिवसानिमित्त सुरेश रैना करणार 'मोठं' काम
author img

By

Published : Nov 25, 2020, 7:24 PM IST

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना येत्या शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) ३४ वर्षांचा होईल. रैना यादिवशी एक मोठी कामगिरी करणार आहे. आपल्या ३४व्या वाढदिवशी रैना उत्तर प्रदेश, जम्मू आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) मधील ३४ शाळांना शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा देण्याचे वचन दिले आहे.

डावखुरा फलंदाज सुरेश रैना हा उपक्रम गार्सिया रैना फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने सुरू करणार आहे. फाउंडेशन अमिताभ शाह यांच्या सहकार्याने काम करेल. या उपक्रमाच्या माध्यमातून या शाळांमध्ये शिकणार्‍या १०, ०००हून अधिक मुलांना आरोग्य आणि स्वच्छतेच्या सुविधा मिळतील.

  • Giving back to the society that has given me so much has always been my guiding philosophy. As I turn 34, I’m excited to launch my most special project yet with @grfcare & @UnstoppableYUVA to provide toilets, drinking water & adolescent health programs across 34 schools in India pic.twitter.com/1ik6LpcwNN

    — Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) November 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रैना म्हणाला, "या उपक्रमाद्वारे माझा ३४वा वाढदिवस साजरा केला जाईल, त्याचा मला आनंद झाला आहे. प्रत्येक मुल दर्जेदार शिक्षणास पात्र आहे. शाळांमधील स्वच्छ पिण्याचे पाणी आणि शौचालयाची सुविधा हा त्यांचा हक्क आहे. मला आशा आहे, की आम्ही तरुणांना पाठिंबा देऊ शकू तसेच 'गार्सिया रैना फाउंडेशन' च्या वतीनेही महत्त्वपूर्ण योगदान देता येईल."

सुरेश रैनाची क्रिकेट कारकीर्द -

सुरेश रैनाने २००५ साली श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पाच वर्षानंतर त्याने श्रीलंकेविरुद्धच पहिला कसोटी सामना खेळला. या सामन्यात त्याने शतक नोंदवले. रैना २०११च्या आणि २०१५च्या विश्चचषक टीममध्येही सहभागी होता. २०१३ची चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धाही तो खेळला आहे.

रैना १८ कसोटी सामने खेळला असून त्यामध्ये त्याने ३१ इनिंगमध्ये ७६८ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये दमदार सुरुवात करूनही रैना फक्त १८ कसोटी सामने खेळला. २६.४८च्या सरासरीने त्याने धावा केल्या. यात १ शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. २२६ एकदिवसीय सामन्यात सुरेश रैनाने ५ हजार ६१५ धावा केल्या. तर ७८ टी-२० सामन्यात त्याने १ हजार ६०५ धावा केल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.