शिमला - कोरोनाचा धोका टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे सर्व जण घरीच थांबले आहेत. पण काही लोक या निर्देशाचे पालन न करता घराबाहेर येत आहेत. अशा लोकांवर पोलीस कारवाई करत आहे. अशीच कारवाई भारतीय क्रिकेट संघातील अष्ठपैलू खेळाडू ऋषी धवनवर झाली.
ऋषी धवन लॉकडाऊनच्या काळात आपल्या कारमधून बाहेर पडला होता. तेव्हा पोलिसांनी त्याला अडवले आणि पासची विचारणी केली. नियमानुसार बाहेर पडल्यास वाहन पासची गरज असते, मात्र हा पास धवनकडे नव्हता. त्यामुळे त्याला लॉकडाऊनचा नियम तोडल्याबद्दल ५०० रुपयांचा दंड केला. ऋषीकडे लॉकडाऊनच्या काळात बाहेर पडण्यासारखे कोणताही कारण नव्हते. त्यामुळे हिमाचल पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. दरम्यान, ऋषि धवनने कोरोना लढ्यात हिमाचल प्रदेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये १ लाख रुपयांची मदत दिली आहे.
ऋषी धवनने ३ एकदिवसीय आणि १ टी-२० सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्याने भारतीय संघाकडून १८ जून २०१६ रोजी अखेरचा सामना खेळला होता. आयपीएलमध्ये ऋषी २००८ साली किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला. पण त्यानंतर फिटनेसमुळे तो पाच वर्ष आयपीएल खेळू शकला नाही. २०१३ मध्ये मुंबई इंडियन्स संघाने त्याला विकत घेतले होते. तर २०१४ मध्ये तो पुन्हा पंजाबकडे गेला. आयपीएलमध्ये ऋषीने २६ सामन्यात १५३ धावा तर १८ विकेट घेतल्या आहेत.
हेही वाचा - मोदी सरकार ठरवेल, भारत-पाक सामना खेळायचा की नाही, दिग्गज खेळाडूनं शोएबला फटकारलं
हेही वाचा - VIDEO : अॅशेसमधील सर्वोत्कृष्ठ झेल, पाहा फक्त साडेतीन मिनिटात अन् तेही एका क्लिकवर...