ETV Bharat / sports

युएईमधून आणलं सोनं; क्रिकेटपटू कृणाल पांड्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या ताब्यात - dri on krunal pandya

आयपीएल विजेता मुंबई इंडियन्स संघाचा खेळाडू कृणाल पांड्याला महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) पथकाने मुंबई विमानतळावर ताब्यात घेतले आहे. कृणाल पांड्याकडे युएईहून येताना सोन्याचे दागिने सापडले. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

cricketer-krunal pandya-taken-into-custody-by-dri at mumbai airport
युएईमधून आणलं सोनं; क्रिकेटपटू कृणाल पांड्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या ताब्यात
author img

By

Published : Nov 12, 2020, 7:47 PM IST

Updated : Nov 13, 2020, 1:06 AM IST

मुंबई - आयपीएल विजेता मुंबई इंडियन्स संघाचा खेळाडू कृणाल पांड्याला महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) पथकाने मुंबई विमानतळावर ताब्यात घेतले आहे. कृणाल पांड्याकडे युएईहून येताना सोन्याचे दागिने सापडले. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, युएईहून मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर कृणाल पांड्याच्या बॅगची तपासणी करण्यात आली. यात सोन्याचे दागिने, ज्यात बांगड्या, मनगटी घड्याळांसह अनेक मौल्यवान वस्तू मिळाल्या. यामुळे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.

काय आहे ड्युटी फ्री नियम-

नियमानुसार दुबईतून जर एखादा पुरुष प्रवासी येत असेल तर त्याला त्याच्यासोबत २० ग्रॅम सोनं बाळगण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्याची किंमत ५० हजाराच्या पुढे नसावी, असा नियम आहे. महिला प्रवाशांसाठी ४० ग्रॅम सोने स्वतः सोबत ठेवण्याची परवानगी असून त्याची किंमत १ लाख रुपयांपर्यंतच्या पुढे नसावी, असा नियम आहे. कृणाल पांड्या याची डीआरआय अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात असून त्याच्याकडे आढळून आलेल्या सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या संदर्भातील कागदपत्रांची चौकशी केली जात आहे.

कोण आहे कृणाल पांड्या?

कृणाल पांड्या हा आयपीएलच्या मुंबई इंडियन्स या संघाचा २०१६ पासूनचा सदस्य खेळाडू असून या संघामध्ये त्याने महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. मुंबई इंडियन्स संघासाठी त्याने आयपीएल २०२० च्या मोसमात १६ सामने खेळले असून १०९ धावा केल्या. तसेच, गोलंदाजी करून ६ बळीसुद्धा घेतल्या.

हेही वाचा - धोनीची पोल्ट्री उद्योगात एंट्री; पाळणार 'कडकनाथ' कोंबड्या

हेही वाचा - खुशखबर..! २०२१ चा टी-२० विश्वकरंडक भारतातच, ICC कडून शिक्कामोर्तब

Last Updated : Nov 13, 2020, 1:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.