लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेमध्ये यजमान इंग्लडला विजयाचा दावेदार मानले जात आहे. मात्र, श्रीलंका विरुध्द झालेल्या पराभवानंतर अंतिम चारमध्ये जागा मिळवणे इंग्लडला कठीण ठरणार आहे. इंग्लडचे या स्पर्धेत ६ सामने झाले असून यामध्ये इंग्लडने ४ विजय मिळवला तर राहिलेले २ सामन्यात पराभव पत्कारावाला लागला. सद्य स्थितीत इंग्लडचे ८ गुण असून गुणातालिकेत ते ३ नंबरवर आहेत. असे असतानाही इंग्लडला अंतिम चारची वाट कठीण आहे. वाचा काय आहे रिपोर्ट...
इंग्लडचे ६ सामने झाले असून आणखी ३ सामने इंग्लड खेळणार आहे. मात्र हे तीनही सामने इंग्लडला 'टफ' संघाबरोबर खेळावे लागणार आहेत. इंग्लड ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि भारत या संघाविरुध्द खेळणार आहे. तसा इतिहास पाहता १९९२ पासून इंग्लडने या तीनही संघावर विश्वकरंडक स्पर्धेत विजय मिळवलेला नाही. हा मागील २७ वर्षापासूनचा इतिहास आहे.
आता या स्पर्धेत, इंग्लडला याच संघाविरुध्द 'दोन हात' करावे लागणार आहे. दरम्यान, श्रीलंकेने पराभव केल्यानंतर इंग्लडचा कर्णधार इयॉन मार्गनने आम्ही पुढील सामन्यात दमदार वापसी करु, आमचा संघ समतोल असून आम्ही ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या सामन्यात विजयी होऊ असा विश्वास त्याने बोलून दाखवला आहे.