मुंबई - दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघातील दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्या दोन्ही खेळाडूंची नावं जाहीर न करण्याचा निर्णय दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने घेतला आहे. या संदर्भातील वृत्त एका क्रीडा संकेतस्थळाने दिलं आहे.
क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने कुकुजा येथे १८ ते २२ ऑगस्ट या दरम्यान होणाऱया कँप पूर्वी ५० खेळाडूंची आणि संघ व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली. यातील २ खेळाडू कोरोनाबाधित आढळून आले. यामुळे ते बाधित खेळाडू कँपमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या दोन्ही खेळाडूंना तात्काळ क्वारंटाइन करण्यात आले आहे. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, या कँपमध्ये माजी कर्णधार फाफ डु-प्लेसिस याने सहभाग घेतला नव्हता. त्याने कुटूंबाचे कारण देत या कँपमधून माघार घेतली होती.
चीनच्या वूहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभरातील २ कोटीहून अधिक लोक बाधित झाले आहेत. तर ७ लाखाहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण अमेरिकेत आहेत. यानंतर ब्राझीलचा नंबर लागतो. भारत या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
हेही वाचा - IPL 2020 : 'युएई रेडी'; राजस्थान, पंजाब संघ युएईला रवाना
हेही वाचा - पंतप्रधान मोदींनी धोनीला लिहिले पत्र, म्हणाले...