ETV Bharat / sports

Road Safety World Series: युवराज सिंहने ठोकले ४ चेंडूत ४ षटकार

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये भारताचा युवराज सिंहने शनिवारी झालेल्या सामन्यात इंडिया लिजेड संघाकडून खेळणाना सलग चार षटकार ठोकत २००७ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इंग्लंडविरुद्धच्या आठवणी ताज्या केल्या. दक्षिण आफ्रिका लिजेड संघाविरुद्ध युवीने २२ चेंडूंत नाबाद ५२ धावांची खेळी केली.

author img

By

Published : Mar 14, 2021, 3:19 PM IST

road safety world series yuvraj-singh-hits-4-sixes-in-4-ball-india-legends-win
Road Safety World Series: युवराज सिंहने ठोकले ४ चेंडूत ४ षटकार

रायपूर - रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये भारताचा युवराज सिंहने स्फोटक फलंदाजीचा नजराणा पेश केला. त्याने शनिवारी झालेल्या सामन्यात इंडिया लिजेड संघाकडून खेळणाना सलग चार षटकार ठोकत २००७ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इंग्लंडविरुद्धच्या आठवणी ताज्या केल्या. दक्षिण आफ्रिका लिजेड संघाविरुद्ध युवीने २२ चेंडूंत नाबाद ५२ धावांची खेळी केली. यासोबत त्याने गोलंदाजीत दोन विकेट देखील घेतल्या. युवराजच्या या कामगिरीच्या जोरावर इंडिया लिजेडने या स्पर्धेत पाचवा विजय मिळवला. इंडिया लिजेडने हा सामना ५६ धावांनी जिंकला. तर अष्टपैलू कामगिरी नोंदवणारा युवराज सामनावीर ठरला.

दक्षिण आफ्रिका लिजेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा युवराज (५२) आणि सचिन (६०) च्या खेळीच्या जोरावर इंडिया लिजेडने २० षटकांत ३ बाद २०४ धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात सचिन तेंडुलकरने ३७ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ६० धावा केल्या. एस बद्रीनाथने ३४ चेंडूत ४ चौकार व २ षटकारांसह ४२ धावा केल्या. युसूफ पठाण यानेही १० चेंडूंत २ चौकार व २ षटकारासह २३ धावा झोडपल्या.

युवीने या सामन्याच्या १८व्या षटकात झँडर डी ब्रूयनच्या एका षटकात सलग चार षटकार खेचले. त्याने या सामन्यात २२ चेंडूंत २ चौकार व ६ षटकार ठोकत नाबाद ५२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल आफ्रिका लिजेडचा संघ निर्धारीत २० षटकात ७ बाद १४८ धावांपर्यंत मजल मारू शकला. अँड्र्यू पुटीक (४१), मोर्ने वाक विक (४८) या दोघांनी आफ्रिका संघाला ८७ धावांची सलामी दिली. पण हे दोघे बाद झाल्यानंतर आफ्रिकेचा डाव गडगडला. परिणामी त्यांचा पराभव झाला.

हेही वाचा - रोहितला विश्रांती दिल्याने सेहवाग विराटवर भडकला, म्हणाला...

हेही वाचा - IPL मध्ये धावांचा पाऊस पाडणारा 'हा' फलंदाज म्हणतोय, मी इंग्लंडविरुद्ध कोणत्याही क्रमांकावर खेळण्यासाठी तयार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.