लंडन - महेंद्रसिंह धोनी हा क्रिकेटविश्वातील 'बेस्ट फिनीशर' मानला जातो. मात्र मागील काही सामन्यात धोनीची बॅट तळपलेली नाही. यामुळे त्याच्यावर प्रचंड टीका होत आहे. असे असताना धोनी मैदानात यष्टीरक्षकासह पर्यायी कर्णधाराची भूमिका समक्षपणे पार पाडतो. सद्या सोशल मीडियावर धोनीचा एक फोटो व्हायरल होत आहे. काय सांगतो तो फोटो.
विश्वकरंडक स्पर्धेत अंजिक्य भारतीस संघाला इंग्लडने ३१ धावांनी पराभव केला. या सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या अंगठ्याला लागले होते. त्या जखमेतून रक्तही येत होते. तेव्हाही धोनीने मैदान सोडले नाही. त्याने भारतीय संघाला पुरेपूर विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. सद्या हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
भारतीय संघ जेव्हा जेव्हा अडचणीत येतो. तेव्हा 'संकटमोचक' म्हणून धोनी धावून येतो. मागील काही सामन्यात धोनीची बॅट तळपली नसल्याने त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. मात्र हाच धोनी ज्यानं क्षेत्ररक्षण असो की यष्टीरक्षण यामध्ये मह्त्त्वपूर्ण योगदान देत विजय मिळवून दिला आहे. अनेक वेळा धोनीच्या सल्ल्यामुळेच भारतीय संघाला विजय मिळाला आहे.
महेंद्रसिंह धोनी हा शांत खेळाडू म्हणून ओळखला जातो. अनेक वेळा त्याच्यावर टीका झाली. मात्र, त्याने टीकाकारांना आपल्या खेळीतून उत्तर दिले आहे.