मेलबर्न - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनीमध्ये होणार आहे. पण सद्या सिडनीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे हा सामना होणार की नाही याबाबत सशांकता निर्माण झाली आहे. अशात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यावर एक दुसरा पर्याय निवडला आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आज (गुरुवार) सांगितले की, सिडनीमध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. असे असले तरी नियोजित कार्यक्रमानुसार तिसरा सामना सिडनीमध्ये खेळवण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. जर परिस्थिती आणखी बिकट होत गेली तर हा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात येईल. मेलबर्नकडे दुसरा पर्याय म्हणून पाहिले जात आहे
दरम्यान, सिडनीच्या उत्तरेकडील भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. पण क्विंसलँडमध्ये अद्याप परिस्थिती सुधारलेली नाही. यामुळे खेळाडू आणि प्रसारण टीम यांना प्रवासाला परवानगी मिळणे कठीण बनले आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले यांनी सांगितले की, बोर्ड क्विसलँड सरकारच्या संपर्कात आहे. दुसरीकडे मेलबर्न क्रिकेट क्बबचे साईओ स्टुअर्ट फॉक्स यांनी आज सांगितले की, आम्ही लागोपाठ दोन सामने आयोजित करण्यासाठी तयार आहोत. परंतु आमची इच्छा आहे की, नियोजित कार्यक्रमानुसार हा सामना सिडनीमध्ये खेळवला जावा.
टीम इंडिया कसोटी मालिकेत पिछाडीवर
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्याची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातील पहिला सामना (दिवस रात्र) अॅडलेडच्या मैदानात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. हा सामना ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
हेही वाचा - Aus vs Ind: टीम इंडिया कसोटी मालिकेत उलटफेर करू शकते; ऑस्ट्रेलियाच्या माजी प्रशिक्षकांनी सांगितलं कारण
हेही वाचा - Ind Vs Aus: बॉक्सिंग डे कसोटीत 'या' पाच रेकॉर्डवर नजर; पुजारा आणि लियोन यांना इतिहास रचण्याची संधी