मुंबई - उत्कृष्ट चेंडू यष्ट्यांना स्पर्श करुन यष्टीरक्षकाच्या ग्लोजमध्ये विसावला. पण बेल्स न उडाल्याने फलंदाज नाबाद ठरला. तेव्हा गोलंदाजांने फलंदाजाला पायाने लाथ घालण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार वेस्ट इंडीजमध्ये सुरू असलेल्या कॅरेबियन प्रीमिअर लीगमधील जमैका थलाइवाज आणि बारबाडोस ट्रायटेंड्स यांच्यातील सामन्यादरम्यान, घडला.
सीपीएल २०२० मध्ये जमैका थलाइवाज आणि बारबाडोस ट्रायटेंड्स यांच्यात स्पर्धेचा २८ वा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात जमैका थलाइवाजचा पराभव झाला. सामना दरम्यान, फिरकीपटू राशिद खानच्या चेंडूवर आंद्रे रसेल बाद होता होता बचवला. राशिदचा एक अप्रतिम चेंडू यष्ट्यांना स्पर्श करुन यष्टीरक्षकाच्या ग्लोजमध्ये विसावला. पण बेल्स उडाल्या नाहीत. यामुळे फलंदाज आंद्रे रसेल नाबाद ठरला.
रसेल बाद होण्यापासून बचावल्याने, राशिद निराश झाला आणि त्याने रसेलला लाथ मारण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये मस्तीत हा प्रकार झाला. यामुळे मैदानावरिल पंचांसह टीव्हीवर सामना पाहत असलेल्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.
-
THE LIGHTS ARE ON.... Dre Russ has a lucky escape. #CPL20 #JTvBT #CricketPlayedLouder pic.twitter.com/EcQ1TM8eog
— CPL T20 (@CPL) September 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">THE LIGHTS ARE ON.... Dre Russ has a lucky escape. #CPL20 #JTvBT #CricketPlayedLouder pic.twitter.com/EcQ1TM8eog
— CPL T20 (@CPL) September 5, 2020THE LIGHTS ARE ON.... Dre Russ has a lucky escape. #CPL20 #JTvBT #CricketPlayedLouder pic.twitter.com/EcQ1TM8eog
— CPL T20 (@CPL) September 5, 2020
दरम्यान, सीपीएल २०२० च्या गुणातालिकेत ट्रिनबागो नाइट रायडर्स ९ सामन्यातील ९ विजयासह पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या स्थानावर गयाना अमेजन वारियर्स असून बारबाडोस ट्रायटेंड्स पाचव्या स्थानी आहे. रसेलने सीपीएलच्या या हंगामात ७ सामन्यातील ६ डावात खेळताना २२० धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे राशिद खानने ११ गडी टिपले आहेत.
हेही वाचा - IPL 2020 : 'या' सात खेळाडूंनी घेतली माघार, त्यांच्या जागेवर कोण खेळणार, जाणून घ्या...
हेही वाचा - चेंडूला सॅनिटायझर लावल्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचे निलंबन; ३ गडी केले होते बाद