मुंबई - माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २७ मार्चला सचिनला कोरोनाची लागण झाली असून तो घरीच उपचार घेत होता. आता सावधगिरी म्हणून त्याला रूग्णालयात दाखल केले आहे. स्वत: सचिननेच ट्विटरवरून याची माहिती दिली.
-
Thank you for your wishes and prayers. As a matter of abundant precaution under medical advice, I have been hospitalised. I hope to be back home in a few days. Take care and stay safe everyone.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 2, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Wishing all Indians & my teammates on the 10th anniversary of our World Cup 🇮🇳 win.
">Thank you for your wishes and prayers. As a matter of abundant precaution under medical advice, I have been hospitalised. I hope to be back home in a few days. Take care and stay safe everyone.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 2, 2021
Wishing all Indians & my teammates on the 10th anniversary of our World Cup 🇮🇳 win.Thank you for your wishes and prayers. As a matter of abundant precaution under medical advice, I have been hospitalised. I hope to be back home in a few days. Take care and stay safe everyone.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 2, 2021
Wishing all Indians & my teammates on the 10th anniversary of our World Cup 🇮🇳 win.
आज भारताच्या विश्व विजयाला १० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त सचिनने संघातील आपल्या सहकाऱयांना आणि भारतीयांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. सचिनला २७ मार्चला कोरोनाची लागण झाली होती. याची देखील त्याने टि्वटकरून माहिती दिली होती. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सचिन होमआयसोलशनमध्ये होता. त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती.
सचिनने काही दिवसांपूर्वी जागतिक रस्ता सुरक्षा मालिकेमध्ये सहभाग घेतला होता. त्याच्यासोबत भारतीय संघात खेळलेल्या इरफाण पठाण, युसुफ पठाण आणि एस. बद्रीनाथ यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
हेही वाचा - IPL २०२१ : श्रेयस अय्यर आयपीएलला मुकला; पंत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार