ETV Bharat / sports

'कर्फ्यू काळात मजा-मस्तीसाठी रस्त्यावर उतरणे, याला देशाशी प्रामाणिक राहणे म्हणत नाहीत' - विराट कोहलीने लॉकडाऊन व्यवस्थित पाळण्याचं केलं आवाहन

सरकार आणि मेडिकल टीम यासाठी खूप मेहनत घेत आहे. आपल्या घरातील कोणत्याही व्यक्ती आपल्यामुळे काही झाल्यास, तुम्हाला कसं वाटेल. लॉकडाऊन, कर्फ्यू काळात मजा-मस्तीसाठी रस्त्यावर उतरणे याला देशाशी प्रामाणिक राहणे म्हणत नाहीत. माझं तुम्हाला कळकळीचे आव्हान आहे की, तुम्ही सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन करा, असे विराट म्हणाला.

Coronavirus: Virat Kohli Requests People To Take 21-Day Lockdown Seriously
'कर्फ्यू काळात मजा-मस्तीसाठी रस्त्यावर उतरणे, याला देशाशी प्रामाणिक राहणे म्हणत नाहीत'
author img

By

Published : Mar 28, 2020, 8:08 AM IST

मुंबई - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या देशात गंभीर वातावरण निर्माण झालेले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. या परिस्थितीशी झुंज देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र लॉकडाऊन घोषित असतानाही काही लोक घराबाहेर पडत आहेत. यामुळे पोलीस यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. अशा नियम मोडणाऱ्या लोकांवर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली भडकला आहे.

विराटने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्याने नियम मोडणाऱ्या लोकांचा खरपूस समाचार घेतला आहे. तो म्हणतो, 'मी विराट कोहली, आज तुम्हाला खेळाडू म्हणून नाही तर भारताचा एक नागरिक म्हणून बोलत आहे. मी मागील काही दिवसांपासून पाहात आहे की, लोक झुंडीने रस्त्यावर गर्दी करत आहेत. लॉकडाऊन, कर्फ्यूचे नियम न पालन करत नाहीयेत. हे पाहून असं वाटतं आहे की, आपण कोरोनाविरुद्धची लढाई गांभीर्याने घेत नाही आहोत.'

  • Please wake up to the reality and seriousness of the situation and take responsibility. The nation needs our support and honesty. pic.twitter.com/ZvOb0qgwIV

    — Virat Kohli (@imVkohli) March 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सरकार आणि मेडिकल टीम यासाठी खूप मेहनत घेत आहे. आपल्या घरातील कोणत्याही व्यक्ती आपल्यामुळे काही झाल्यास, तुम्हाला कसं वाटेल. लॉकडाऊन, कर्फ्यू काळात मजा-मस्तीसाठी रस्त्यावर उतरणे याला देशाशी प्रामाणिक राहणे म्हणत नाहीत. माझं तुम्हाला कळकळीचे आव्हान आहे की, तुम्ही सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन करा, असेही विराट म्हणाला.

दरम्यान, कोरोना विषाणूचा फैलाव जगभरासह देशात झपाट्याने होत आहे. भारतात ८८७ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. तर यामुळे २० जणांचा देशात मृत्यू झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे.

हेही वाचा - “धोनीला टी-२० वर्ल्डकप खेळण्याची संधी मिळणार”

हेही वाचा - Coronavirus : हिटमॅन रोहित म्हणतो, आधी देश महत्त्वाचा, आयपीएलचा विचार नंतर...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.