मुंबई - कोरोना व्हायरसने जगभरात थैमात घातले असून या व्हायरसमुळे जवळपास ४ हजार लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. जगभरातील १०० हून अधिक देशात या व्हायरसचा फैलाव झाला असून भारतात बुधवारपर्यंत कोरोनाचे ६१ रुग्ण आढळले होते. यामुळे इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धा होणार की नाही यावर सशांकता आहे. पण आता ही स्पर्धा रद्द करण्यात यावी, यासाठी मद्रास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
वकील जी अॅलेक्स बेंझीगर यांनी ही याचिका दाखल केली आहे.
-
Tamil Nadu: A plea has been filed in Madras High Court, seeking direction to the Central Government to not allow Board of Control for Cricket in India (BCCI) to conduct IPL matches from March 29-May 24, in view of #CoronaVirus. pic.twitter.com/XTcXAqOcPi
— ANI (@ANI) March 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Tamil Nadu: A plea has been filed in Madras High Court, seeking direction to the Central Government to not allow Board of Control for Cricket in India (BCCI) to conduct IPL matches from March 29-May 24, in view of #CoronaVirus. pic.twitter.com/XTcXAqOcPi
— ANI (@ANI) March 11, 2020Tamil Nadu: A plea has been filed in Madras High Court, seeking direction to the Central Government to not allow Board of Control for Cricket in India (BCCI) to conduct IPL matches from March 29-May 24, in view of #CoronaVirus. pic.twitter.com/XTcXAqOcPi
— ANI (@ANI) March 11, 2020
काय आहे याचिकेत -
जागतिक आरोग्य संघटनेच्या ( WHO) च्या अधिकृत्त वेबसाईटवरील माहितीनुसार अजूनपर्यंत कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या औषधाचा शोध लागलेला नाही. कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. यामुळे केंद्र सरकारने बीसीसीआयला आयपीएलचे सामने खेळवण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी बेंझीगर यांनी आपल्या याचिकेत केली आहे.
इटली फुटबॉल फेडरेशन लीगने देशात होणारे सर्व सामने रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचेही, बेंझीगगर यांनी याचिकेत म्हटले आहे.
दरम्यान, बेंझीगर यांच्या याचिकेवर गुरुवारी म्हणजेच १२ मार्चला न्यायाधीश एमएम सुरेंद्र आणि कृष्णन रामास्वामी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
याआधी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आयपीएल पुढे ढकलण्यासंदर्भात बोलणी सुरू असल्याचे म्हटले आहे. तर कर्नाटकनेही आयपीएल स्पर्धा पुढे ढकला अन्यथा रद्द करा, अशी मागणी केंद्राकडे पत्राद्वारे केली आहे.
हेही वाचा - 'वाडा' अहवाल चुकीचा, परेराला द्यावी लागली ५ लाख डॉलरची नुकसान भरपाई
हेही वाचा - रणजी अंतिम सामना : सौराष्ट्राचा पहिला डाव आटोपला, आकाशचे चार बळी