ETV Bharat / sports

'खंबीर राहा, योग्य काळजी घ्या, आपण कोरोनाविरुद्ध लढा देऊ'

कोरोना विषयावर विराटने एक ट्विट केले आहे. त्यात त्याने या परिस्थितीत खंबीर राहत योग्य ती काळजी घ्या, आपण कोरोनाविरुद्ध लढा देऊ, असा संदेश दिला आहे.

Coronavirus pandemic: "Stay strong and fight outbreak" says captain Kohli
'खंबीर राहा, योग्य काळजी घ्या, आपण कोरोनाविरुद्ध लढा देऊ'; विराटचे आवाहन
author img

By

Published : Mar 14, 2020, 6:16 PM IST

मुंबई - चीनमधून सुरुवात झालेल्या कोरोना विषाणूचा प्रसार जगभरात मोठ्या झपाट्याने होत आहे. या विषाणूला रोखण्यासाठी भारत सरकारने विविध उपाययोजना सुरू केल्या असून नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन सरकारने केले आहे, तर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही, खंबीर राहा आणि योग्य ती काळजी घ्या, असे आवाहन केले आहे.

कोरोना विषयावर विराटने एक ट्विट केले आहे. त्यात त्याने या परिस्थितीत खंबीर राहत योग्य ती काळजी घ्या, आपण कोरोनाविरुद्ध लढा देऊ, असा संदेश दिला आहे.

  • Let's stay strong and fight the #COVID19 outbreak by taking all precautionary measures. Stay safe, be vigilant and most importantly remember, prevention is better than cure. Please take care everyone.

    — Virat Kohli (@imVkohli) March 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, कोरोनाच्या धोक्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिका अर्ध्यातूनच रद्द करण्यात आली. धर्मशाळा येथील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यानंतर लखनऊ आणि कोलकातामध्ये सामने होणार होते. पण कोरोनाच्या धोक्यामुळे हे सामने रद्द करण्यात आले.

कोरोनाने जगात धुमाकूळ घातला आहे. या विषाणूमुळे जगभरातील ५ हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर १०० हून अधिक देशांमध्ये याचा प्रसार झाला आहे. भारतामध्ये कोरोनाचे ८० पेक्षा जास्त रुग्ण आहेत. महाराष्ट्रात १९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

हेही वाचा - कोरोनाचा कहर! बीसीसीआयने अनिश्चित काळासाठी 'या' स्पर्धा पुढे ढकलल्या

हेही वाचा - शाहरुख म्हणतो, कोरोनाचा लवकरच 'दी एन्ड' अन् आयपीएलचा थरार सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.