मुंबई - कोरोनाच्या संकटामुळे काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवला आला आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूंराच्या यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. अशा गरीब लोकांना मदत करण्यासाठी अनेक जण पुढाकार घेत आहेत. भारतीय ए संघातील सलामीवीर आणि पश्चिम बंगाल संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरण याने डेहराडूनमधील गरीब लोकांना मदत केली.
अभिमन्यूने गरीब लोकांसाठी २.५ लाख रुपयांची मदत जाहीर केली असून त्याने ही मदत पोलिसांकडे सोपवली आहे. याशिवाय तो १०० हून अधिक लोकांच्या घरी अन्न-धान्य पोहोचवत आहे. याविषयी सांगताना ईश्वरण म्हणाला, 'डेहराडूनच्या पोलिसांकडे मी २.५ लाख दिले आहेत. जे मजूर अडकले आहेत त्यांना अन्न-धान्याची सोय यातून केली जाईल.'
दरम्यान, अभिमन्यूच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बंगला संघाने यावर्षीच्या रणजी करंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. पण फायनलमध्ये त्यांचा सौरष्ट्रकडून पराभव झाला. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर सौराष्ट्र संघाला विजय मिळाला.
अभिमन्यूच्या आधी, आयपीएलमधील संघ सनरायझर्स हैदाराबादने १० कोटीची मदत दिली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघानेही (एआयएफएफ) पंतप्रधान मदत निधीसाठी २५ लाखांची मदत केली आहे. कोलकाता येथील फुटबॉल क्लब मोहन बागाननेही २० लाख रुपये दिले आहेत. याशिवाय सचिन तेंडुलकर, सुनिल गावसकर, सौरव गांगुली, अजिंक्य रहाणे, बजरंग पुनिया, पी. व्ही. सिंधू, मेरी कोम, मिताली राज, रोहित शर्मा, विराट कोहली, पूनम यादव, दीप्ती शर्मा, केदार जाधव, हरभजन सिंग, युवराज सिंह, हिमा दास, इरफान पठाण, युसूफ पठाण, चेतेश्वर पुजारा, अर्जुन भाटी आदींनी मदत दिली आहे.
हेही वाचा - गब्बरने सांगितले डोक्यावर केस न ठेवण्याचे राज..
हेही वाचा - विस्डेन २०१९ च्या यादीत रोहितचा समावेश नसल्याने लक्ष्मण यांनी व्यक्त केले आश्चर्य