मुंबई - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवासांसाठी संचारबंदी लागू केली आहे. मोदी यांच्या या निर्णयाचे समर्थन इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केवीन पीटरसनने केलं आहे. महत्वाची बाब म्हणजे, पीटरसनने हात जोडून चक्क हिंदी भाषेतून भारतीयांना आवाहन केलं आहे.
केवीन पीटरसनने एक ट्विट केलं आहे. त्यात तो म्हणतो, 'मी ऐकलं की, तुमची अवस्था आमच्या सारखी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत. माझं तुम्हा सर्वांना आवाहन आहे की, तुम्ही याचं पालन करा. आपण सगळे एकजूट होऊन कोरोनाला हरवू आणि यातून बाहेर पडू. कृपा करुन कोणीही घराबाहेर पडू नका आणि सुरक्षित राहा.'
-
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
— Kevin Pietersen🦏 (@KP24) March 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 pic.twitter.com/e9MENc6FPp
">🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
— Kevin Pietersen🦏 (@KP24) March 24, 2020
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 pic.twitter.com/e9MENc6FPp🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
— Kevin Pietersen🦏 (@KP24) March 24, 2020
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 pic.twitter.com/e9MENc6FPp
दरम्यान, कोरोनाने जगभरात थैमान घातले असून दिवसेंदिवस याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. आजघडीपर्यंत कोरोनामुळे १९ हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर ४ लाखांहून अधिक लोकांना यांची लागण झाली आहे. भारतातही कोरोनाचे ५०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांसाठी संचारबंदी लागू केली आहे.
हेही वाचा - Corona Virus : सानिया मिर्झा रोजंदारी मजुराच्या मदतीसाठी सरसावली
हेही वाचा - VIDEO : जब से हुई है शादी, आफत गले पडी है ! शिखर धुतोय कपडे अन् टॉयलेट...