मुंबई - लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडू नका, असे आवाहन सर्वस्तरामधून केले जात आहे. यात आता भारतीय संघाचा फलंदाज अजिंक्य रहाणेची एक वर्षाची, चिमुकलीही सामील झाली आहे. अजिंक्यच्या मुलीने सर्वांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे. याचा व्हिडिओ अजिंक्यची पत्नी राधिकाने शेअर केला आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. क्रीडा विश्वातील जवळपास सर्व स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे खेळाडू आपापल्या घरात परिवारासोबत वेळ घालवण्याबरोबरच सोशल मीडियावरही व्हिडिओ, फोटो पोस्ट करत आहेत. अजिंक्य आणि तिची पत्नी राधिका हिने मुलगी आर्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये अजिंक्य बेडवर बसला आहे आणि आर्या त्याच्या शेजारी झोपली आहे. अजिंक्य आर्याला घराच्या बाहेर पडायचे का? असे विचारतो. यावर आर्या नकारार्थी मान हलवते. बाप-लेकीचा हा संवाद मराठीत आहे. राधिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, 'आर्यालाही माहिती आहे. घरात राहा. सुरक्षित राहा.'
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अजिंक्य रहाणेने बालपणीची मैत्रिण राधिकासोबत २६ नोव्हेंबर २०१४ रोजी मुंबईत लग्न केले. अजिंक्य-राधिका यांना ५ ऑक्टोबरला मुलगी झाली आणि त्यांनी तिचे नाव आर्या असे ठेवले. दरम्यान, आर्याच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत आहे. कोरोना लढ्यासाठी अजिंक्यने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये १० लाख रुपयांची मदत केली होती.
हेही वाचा - भारताला पैशांची गरज नाही, शोएबच्या भारत-पाक सामन्याच्या प्रस्तावावर कपिल देव भडकले
हेही वाचा - सचिनने अंजली वहिनीसोबत 'डार्लिंग, आंखें चार करने दो' गाण्यावर केला डान्स, हरभजनने सांगितली आठवण