ETV Bharat / sports

विंडीजचे माजी कर्णधार क्लाईव्ह लॉईड म्हणतात 'हा' संघ होईल जगज्जेता

विश्वकरंडक स्पर्धेची सुरुवात ३० मे ला यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सामन्यापासून होणार आहे, तर अंतिम सामना १४ जुलैला लॉडर्सच्या मैदानावर खेळण्यात येईल.

author img

By

Published : May 17, 2019, 9:09 PM IST

विंडीजचे माजी कर्णधार क्लाईव्ह लॉईड म्हणतात 'हा' संघ होईल जगज्जेता

नवी दिल्ली - विश्वकरंडक स्पर्धेसाठी आता २ आठवड्यांपेक्षा कमी वेळ बाकी राहिला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक महान क्रिकेटपटूंनी आपली मते मांडण्यास सुरुवात केली आहे. विंडीजचे महान खेळाडू क्लाईव्ह लॉईड यांच्यानुसार यजमान इंग्लंडचा संघ विश्वकरंडक स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे.

विंडीजचे माजी दिग्गज कर्णधार क्लाईव्ह लॉईड यांच्या मते इंग्लंडचा संघ विश्वचषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असेल. गेला काही काळ इंग्लंडचा संघ तुफान फॉर्मात असून दमदार कामगिरी करत आहे. तसेच इंग्लंड हा एक संतुलित संघ असून ही विश्वकरंडक स्पर्धा इंग्लंडच्या घरच्या मैदानांवर होणार असल्याने त्यांना पराभूत करणे कठीण जाणार असल्याचे लॉईड म्हणाले.

इंग्लंड
इंग्लंड

या विश्वकरंडक स्पर्धेत विंडीजचा संघही दमदार कामगिरी करेल. विंडीज क्रिकेट बोर्डाने विश्वकरंडकासाठी यावेळी ख्रिस गेल, आंद्रे रसेल यांसारख्या दिग्गज खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. हे अनुभवी खेळाडू या स्पर्धेत मिळालेल्या संधीचे सोने करतील अशी आशा लॉईड यांनी व्यक्त केली आहे.

विश्वकरंडक स्पर्धेची सुरुवात ३० मे ला यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सामन्यापासून होणार आहे, तर अंतिम सामना १४ जुलैला लॉडर्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळण्यात येईल. इंग्लंडच्या संघाने आतापर्यंत १९७९, १९८७ आणि १९९२ या साली विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. मात्र वनडेमध्ये त्यांना एकदाही जगज्जेता होण्याचा मान मिळाला नाही.

Intro:Body:

Spo 01

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.