नवी दिल्ली - विंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल मैदानावर नेहमीच रौद्र रूप दाखवतो. अनेक गोलंदाज त्याच्यापासून चार हात लांबच असतात. मात्र, यावेळी गेलने मैदानाबाहेर रूद्रावतार धारण केले. एका विमान कंपनीला गेलने खडे बोल सुनावले आहेत.
हेही वाचा - बांगलादेशविरूद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्याआधी चाहत्यांसाठी वाईट बातमी!
त्याचे झाले असे, एमिरेट्स (Emirates Airline) या विमान कंपनीचे तिकीट कन्फर्म असतानाही गेलला विमान प्रवास नाकारण्यात आला. शिवाय, तडजोड म्हणून विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनीने गेलला बिझनेस क्लासचे तिकीट असतानाही इकॉनॉमी क्लासने प्रवास करायला लावले. या घटनेबद्दल गेलने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून संताप व्यक्त केला आहे.
-
So disappointed @emirates, I have a confirmed flight and they gonna tell me that they are over booked, WTF! Not only that, @emirates want me to travel economy when it’s a business class ticket - so now I have to travel on a later flight! Just ridiculous @emirates!Bad experience😡
— Chris Gayle (@henrygayle) November 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">So disappointed @emirates, I have a confirmed flight and they gonna tell me that they are over booked, WTF! Not only that, @emirates want me to travel economy when it’s a business class ticket - so now I have to travel on a later flight! Just ridiculous @emirates!Bad experience😡
— Chris Gayle (@henrygayle) November 4, 2019So disappointed @emirates, I have a confirmed flight and they gonna tell me that they are over booked, WTF! Not only that, @emirates want me to travel economy when it’s a business class ticket - so now I have to travel on a later flight! Just ridiculous @emirates!Bad experience😡
— Chris Gayle (@henrygayle) November 4, 2019
'मी या घटनेबद्दल अतिशय निराश झालो आहे. तिकीट कन्फर्म असतानाही मला विमान संपूर्ण भरल्याचे सांगत प्रवास नाकारला. हे अत्यंत खेदजनक आहे. फार वाईट अनुभव होता', असे गेलने आपल्य़ा ट्विटमध्ये म्हटले आहे.