नवी दिल्ली - भारताची अव्वल महिला खेळाडू मिताली राजने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निवृत्तीनंतर, आणि तिने दिलेल्या क्रिकेटमधील योगदानानंतर विविध क्षेत्रातील लोकांनी तिचे आभार मानले आहेत. टीम इंडियाचा फलंदाज चेतेश्वर पुजारानेदेखील तिचे ट्विटरवरुन कौतुक केले आहे.
-
Congratulations on a great T20 international career @M_Raj03! You are an inspiration for tons of girls out there 🇮🇳🙏 #MithaliRaj
— cheteshwar pujara (@cheteshwar1) September 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Congratulations on a great T20 international career @M_Raj03! You are an inspiration for tons of girls out there 🇮🇳🙏 #MithaliRaj
— cheteshwar pujara (@cheteshwar1) September 3, 2019Congratulations on a great T20 international career @M_Raj03! You are an inspiration for tons of girls out there 🇮🇳🙏 #MithaliRaj
— cheteshwar pujara (@cheteshwar1) September 3, 2019
हेही वाचा - मिताली राजचा टी-२० क्रिकेटला अलविदा, आता 'या' कामावर देणार लक्ष
पुजाराने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, 'टी-२० मधील चांगल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीसाठी तुझे अभिनंदन. तू खुप प्रेरणादायी आहेस. विशेषत: हजारो मुलींचे तू प्रेरणास्थान आहेस.' ३६ वर्षीय मितालीने ३२ टी-२० सामन्यांमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व केले आहे.
मिताली आता एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेवर लक्ष देणार आहे. तिने ३२ टी-२० सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. यामध्ये तीन टी-२० विश्वकरंडक स्पर्धांचा समावेश आहे. तिने २०१२, २०१४ आणि २०१६ च्या टी -२० विश्वकरंडक स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. मात्र, तिच्या नेतृत्वाखाली भारताने एकदाही विश्वकरंडक उंचावलेला नाही.
८८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये मितालीने २३६४ धावा केल्या आहेत. या धावा करताना ३७.५२ ची तिची सरासरी राहिली आहे. या धावांमध्ये मितालीच्या १७ अर्धशतकांचा समावेश आहे.