ETV Bharat / sports

कुठलं काय ODI अन् टी-२०; कसोटीचं सर्वोत्तम - पुजारा

author img

By

Published : Feb 16, 2020, 1:50 PM IST

पुजाराने सांगितलं, की 'माझ्या दृष्टीने कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकणे, एकदिवसीय आणि टी-२० चे विश्व करंडक जिंकण्यापेक्षा मोठी गोष्ट आहे. कारण कसोटी हा क्रिकेटचा सर्वोत्तम प्रकार आहे. तुम्हाला सर्व जुने खेळाडूंना विचारल्यास तेही तुम्हाला हेच सांगतील. या प्रकारात जर तुम्ही विजेतेपद मिळवलं तर यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही.'

Cheteshwar Pujara marks winning ICC Test Championship as bigger achievement than lifting ODI or T20I World Cup
कसोटी सर्वोत्तम, यात अजिंक्यपद पटकावण्यास यासारखा दुसरा आनंद नाही - पुजारा

हॅमिल्टन - भारतीय कसोटी संघाचा स्पेशालिस्ट फलंदाज चेतेश्वर पुजाराने आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकणे, एकदिवसीय आणि टी-२० विश्व करंडकापेक्षा मोठी गोष्ट असल्याचे सांगितले. त्याने एका टीव्ही शो दरम्यान आपलं मत व्यक्त केलं.

Cheteshwar Pujara marks winning ICC Test Championship as bigger achievement than lifting ODI or T20I World Cup
चेतेश्वर पुजारा

पुजाराने सांगितलं की, 'माझ्या दृष्टीने कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकणे, एकदिवसीय आणि टी-२० चे विश्व करंडक जिंकण्यापेक्षा मोठी गोष्ट आहे. कारण कसोटी हा क्रिकेटचा सर्वोत्तम प्रकार आहे. तुम्हाला सर्व जुने खेळाडूंना विचारल्यास तेही तुम्हाला हेच सांगतील. या प्रकारात जर तुम्ही विजेतेपद मिळवलं तर यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही.'

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंड दौऱ्यातील टी-२० मालिका ५-० ने जिंकली त्यानंतर एकदिवसीय मालिकेत भारताला ३-० ने पराभूत व्हावं लागलं. या पराभवानंतर भारतीय संघ टीकेचा धनी ठरला. भारतीय संघ आता न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामन्याला २१ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे.

दरम्यान, सद्या आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत कसोटी सामने खेळवण्यात येत आहेत. यात आतापर्यंतच्या भारताने एकही सामना गमावला आहे. गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानवर आहे.

आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची गुणतालिका

हेही वाचा -

IPL २०२० : आयपीएलचं बिगुल वाजलं; जाणून घ्या एका क्लिकवर संपूर्ण वेळापत्रक...

हेही वाचा -

IPL २०२० : धोनी इज बॅक, आठ महिन्यांच्या विश्रांतीनंतर खेळणार पहिला सामना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.