ETV Bharat / sports

बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून क्रिकेटपटू आणि अधिकाऱ्यांना विमा संरक्षण

सीएबीच्या वैद्यकीय समितीचे अध्यक्ष प्रदीप डे आणि सदस्य संतनु मित्र यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला एसबीआय जनरल विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. कोरोना व्हायरसविरुद्ध खबरदारीचा उपाय म्हणून सीएबीने सर्व सामने ३१ मार्चपर्यंत स्थगित केले आहेत.

CAB will give Insurance to their cricketers and officials
बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून क्रिकेटपटू आणि अधिकाऱ्यांना विमा संरक्षण
author img

By

Published : Mar 23, 2020, 5:44 PM IST

कोलकाता - दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना व्हायरसच्या घटनांमुळे क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने (सीएबी) आपल्या सर्व क्लब क्रिकेटपटूंना आणि सामन्यांच्या अधिकाऱ्यांना विमा उपलब्ध करून दिला आहे. बंगाल सरकारने रविवारी कोलकाता बंदचे आदेश दिल्यानंतर या आठवड्याच्या शेवटी सीएबीचे कार्यालय बंद राहणार आहे. यापूर्वी कार्यालय २१ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याचे सीएबीने म्हटले होते.

हेही वाचा - श्रीलंकेचा महान कर्णधार संगकारा 'आयसोलेशन'मध्ये

सीएबीच्या वैद्यकीय समितीचे अध्यक्ष प्रदीप डे आणि सदस्य संतनु मित्र यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला एसबीआय जनरल विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. कोरोना व्हायरसविरुद्ध खबरदारीचा उपाय म्हणून सीएबीने सर्व सामने ३१ मार्चपर्यंत स्थगित केले आहेत. सीएबीने स्पर्धा समिती आणि टेक्निकल समितीची आपत्कालीन बैठक आयोजित केली होती. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

तत्पूर्वी, कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने घरच्या मैदानावरील सर्व स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.