ETV Bharat / sports

दिग्गज ब्रायन लारा पुन्हा खेळणार क्रिकेट!

लोकांच्या पुनर्वसनासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नने मदतकार्यासाठी या लीगचे आयोजन केले असून यासाठी भारताचे सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनीलाही विचारणा करण्यात आली होती. या स्पर्धेत लारा खेळणार आहे.

Brian Lara to play in Bushfire relief match at SCG
दिग्गज ब्रायन लारा पुन्हा खेळणार क्रिकेट!
author img

By

Published : Feb 1, 2020, 12:46 PM IST

नवी दिल्ली - विंडीजचा महान माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे. येत्या ८ फेब्रुवारीला होणाऱ्या बुशफायर क्रिकेट लीगमध्ये लारा खेळणार आहे. ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या आगीमुळे बाधित झालेल्या लोकांच्या मदतनिधीसाठी या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा - लोकेश राहुलने मोडला आपल्याच कर्णधाराचा विक्रम!

लोकांच्या पुनर्वसनासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नने मदतकार्यासाठी या लीगचे आयोजन केले असून यासाठी भारताचे सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनीलाही विचारणा करण्यात आली होती. तेव्हा या लीगमध्ये सचिनने सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, सचिन फलंदाज म्हणून नव्हे तर प्रशिक्षकपदाच्या भूमिकेत सहभाग दर्शवणार आहे. वॉर्न आणि रिकी पाँटींग हे दोन ऑस्ट्रेलियन खेळाडू संघांचे प्रतिनिधित्व करणार असून तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचे महान गोलंदाज कर्टनी वॉल्श हे अनुक्रमे पाँटिंग एकादश आणि वॉर्न एकादश संघाच्या प्रशिक्षकपदी दिसणार आहेत.

ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या आगीत ५० कोटीहून अधिक प्राण्यांना जीव गमवावा लागला. अचानक पडलेल्या पावसामुळे आग नियंत्रणात आणण्यात सरकारला यश आले. आता ऑस्ट्रेलियातील जीवन पूर्वपदावर येण्यासाठी जगभरातून मदतीचा हाक दिली जात आहे.

Intro:Body:

 Brian Lara to play in Bushfire relief match at SCG

Brian Lara Bushfire relief match news, Bushfire relief match Lara news, Brian Lara latest cricket match, Brian Lara latest news, Brian Lara match at SCG news, ब्रायन लारा लेटेस्ट न्यूज, ब्रायन लारा बुशफायर क्रिकेट लीग न्यूज, ब्रायन लारा क्रिकेट सामना न्यूज

दिग्गज ब्रायन लारा पुन्हा खेळणार क्रिकेट!

नवी दिल्ली - विंडीजचा महान माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे. येत्या ८ फेब्रुवारीला होणाऱ्या बुशफायर क्रिकेट लीगमध्ये लारा खेळणार आहे. ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या आगीमुळे बाधित झालेल्या लोकांच्या मदतनिधीसाठी या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा - 

लोकांच्या पुनर्वसनासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नने मदतकार्यासाठी या लीगचे आयोजन केले असून यासाठी भारताचे सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनीलाही विचारणा करण्यात आली होती. तेव्हा या लीगमध्ये सचिनने सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, सचिन फलंदाज म्हणून नव्हे तर प्रशिक्षकपदाच्या भूमिकेत सहभाग दर्शवणार आहे. वॉर्न आणि रिकी पाँटींग हे दोन ऑस्ट्रेलियन खेळाडू संघांचे प्रतिनिधित्व करणार असून तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचे महान गोलंदाज कर्टनी वॉल्श हे अनुक्रमे पाँटिंग एकादश आणि वॉर्न एकादश संघाच्या प्रशिक्षकपदी दिसणार आहेत.

ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या आगीत ५० कोटीहून अधिक प्राण्यांना जीव गमवावा लागला. अचानक पडलेल्या पावसामुळे आग नियंत्रणात आणण्यात सरकारला यश आले. आता ऑस्ट्रेलियातील जीवन पूर्वपदावर येण्यासाठी जगभरातून मदतीचा हाक दिली जात आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.