ETV Bharat / sports

ब्रॅड हॉगच्या कसोटी संघात फक्त एका भारतीयाला स्थान

सलामीवीर म्हणून हॉगने इंग्लंडचा माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक आणि स्फोटक डेव्हिड वॉर्नरला स्थान दिले आहे. तिसऱ्या क्रमांकावर, हॉगने केन विल्यम्सनची निवड केली आहे.

Brad Hogg picks his Test XI of the Decade
ब्रॅड हॉगच्या कसोटी संघात फक्त एका भारतीयाला स्थान
author img

By

Published : Jan 3, 2021, 9:11 AM IST

नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉगने २०११ ते २०२० मधील सर्वोत्तम कसोटी संघाची निवड केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हॉगने त्याच्या संघात फक्त एका भारतीय खेळाडूचा समावेश केला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका संघाचे प्रत्येकी तीन, इंग्लंडचे दोन, पाकिस्तान आणि न्यूझीलंडमधील प्रत्येकी एक खेळाडू संघात निवडण्यात आला आहे.

सलामीवीर म्हणून हॉगने इंग्लंडचा माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक आणि स्फोटक डेव्हिड वॉर्नरला स्थान दिले आहे. तिसऱ्या क्रमांकावर, हॉगने केन विल्यम्सनची निवड केली आहे. शिवाय संघाचे नेतृत्वही विल्यम्सनकडे सोपवले आहे. चौथ्या क्रमांकावर भारतीय कर्णधार विराट कोहली तर पाचव्या स्थानावर स्टीव्ह स्मिथ आहे.

Brad Hogg picks his Test XI of the Decade
विराट कोहली

हेही वाचा - भारत वि. ऑस्ट्रेलिया : तब्बल १३२ वर्षांनी घडला असा प्रकार

१८० आंतरराष्ट्रीय बळी घेणाऱ्या ब्रॅड हॉगने अष्टपैलू म्हणून जॅक कॅलिसच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. तर, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सकडे यष्टीरक्षणाची भूमिका सोपवली आहे. वेगवान गोलंदाज म्हणून हॉगच्या संघात ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स, बर्‍याच काळासाठी जागतिक क्रिकेटवर राज्य करणारा डेल स्टेन आणि इंग्लंडच्या जेम्स अँडरसनची निवड केली आहे. ब्रॅड हॉगने आपल्या संघात एकमेव फिरकी गोलंदाज म्हणून पाकिस्तानच्या यासीर शाहचा समावेश केला आहे.

जेम्स अँडरसन

ब्रॅड हॉगचा कसोटी संघ :

अ‍ॅलिस्टर कुक, डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन (कर्णधार), विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, जॅक कॅलिस, एबी डिव्हिलियर्स, पॅट कमिन्स, डेल स्टेन, जेम्स अँडरसन, यासिर शाह.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.