ETV Bharat / sports

'रोहित एकमेव फलंदाज ..जो टी-२० क्रिकेटमध्ये करू शकतो द्विशतक' - rohit sharma

भारताचा स्फोटक सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा हा एकमेव फलंदाज आहे, जो क्रिकेटच्या टी-२० प्रकारात द्विशतक करू शकतो, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने व्यक्त केले आहे.

Brad Hogg Names The Only Player Who Can Hit A T20 Double Century
'रोहित एकमेव फलंदाज जो टी-२० क्रिकेटमध्ये करू शकतो द्विशतक'
author img

By

Published : Mar 15, 2020, 8:55 PM IST

मुंबई - भारताचा स्फोटक सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा हा एकमेव फलंदाज आहे, जो क्रिकेटच्या टी-२० प्रकारात द्विशतक करू शकतो, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने व्यक्त केले आहे.

ब्रॅड हॉग ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत होता. तेव्हा एका चाहत्याने कोणता खेळाडू टी-२० क्रिकेटमध्ये द्विशतक करु शकतो, असे तुला वाटते?, असा सवाल केला. यावर हॉजने, रोहित शर्मा हा सद्यघडीला एकमेव खेळाडू आहे. जो टी-२० प्रकारात द्विशतक करु शकतो. त्याचा स्ट्राईक रेट, टाईमिंग आणि मैदानाच्या चोहोबाजूंनी चेंडू फटकावण्याची तिची मारण्याची क्षमता पाहता, तो द्विशतक करु शकतो, असे सांगितले.

Brad Hogg Names The Only Player Who Can Hit A T20 Double Century
ब्रॅड हॉग

दरम्यान टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने केल्या आहेत. त्याने इंडियन प्रिमिअर लीगमध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध खेळताना १७५ धावा नाबाद झोडपल्या होत्या. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‌ॅरोन फिंचने झिम्ब्बावेविरुद्ध १७२ धावांची खेळी साकारली होती.

टी-२० प्रकारात द्विशतक करणे ही फारच अवघड गोष्टी आहे. कारण प्रत्येक संघाकडे फक्त १२० चेंडू असतात, अशा परिस्थितीत सलामीच्या फलंदाजाला ६० चेंडू जरी मिळाले तर द्विशतकचा विचार करता येत नाही. या उलट कसोटी आणि एकदिवसीय प्रकारात द्विशतक झळकावणे सोपे ठरते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर सर्वाधिक तीन द्विशतके झळकावण्याचा विक्रम आहे.

हेही वाचा - कोरोना इफेक्ट : १४ खेळाडूंनी पीएसएल लीग मध्यातच सोडून गाठलं घर

हेही वाचा - खळबळजनक..! दुबईहून परतलेले रायगडचे १८ क्रिकेटपटू जिल्हा रुग्णालयातून पळाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.