लंडन - इंग्लंडचे माजी कर्णधार आणि महान वेगवान गोलंदाज बॉब विलीस (वय ७०) यांचे बुधवारी (ता. ४) निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी विलीस यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्याची माहिती दिली.
क्रिकेट विश्वात 'गूस' या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले विलीस यांनी १९७०-७१ मध्ये अॅशेस मालिकेतून कसोटी पदार्पण केले होते. अॅलन वार्ड अॅशेस मालिकेआधी जखमी झाल्याने २१ वर्षीय विलीस यांची इंग्लंडच्या संघात वर्णी लागली होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ९० कसोटी सामने खेळताना त्यांनी ३२५ बळी मिळविले. इंग्लंडमधील सर्वकालीन सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये त्यांचा चौथा क्रमांक लागतो.
-
England great Bob Willis 1949-2019
— ICC (@ICC) December 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
90 Tests
325 wickets
Ashes hero
May he rest in peace. pic.twitter.com/EsqgYX8qAL
">England great Bob Willis 1949-2019
— ICC (@ICC) December 4, 2019
90 Tests
325 wickets
Ashes hero
May he rest in peace. pic.twitter.com/EsqgYX8qALEngland great Bob Willis 1949-2019
— ICC (@ICC) December 4, 2019
90 Tests
325 wickets
Ashes hero
May he rest in peace. pic.twitter.com/EsqgYX8qAL
विलीस यांच्या निधनाची माहिती देताना विलीस कुटुंबीयांनी आम्ही एक चांगली व्यक्ती, नवरा, वडील, भाऊ आणि आजोबा गमावलो आहोत. आम्हाला सदैव त्यांची आठवण येईल, असे म्हटले आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विलीस हे समालोचक म्हणूनही चांगले लोकप्रिय होते. ते स्काय स्पोर्टसवर क्रिकेट समालोचक म्हणून कार्यरत होते.
हेही वाचा - धोनी के आवाज में पेश है, जब कोई बात बिगड जाए...व्हिडिओ मात्र स्वतःच्या रिस्कवर पाहा
हेही वाचा - धावपटू योहान ब्लॅक केकेआर, आरसीबी संघाकडून आयपीएल खेळण्यासाठी इच्छुक