अमरावती - राष्ट्रीय अपंग कल्याण संस्थेच्या वतीने अमरावतीच्या चिखलदरा येथे राज्यस्तरीय अंध विद्यार्थी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यभरातील ९ संघानी सहभाग नोंदवला होता. अंतिम सामन्यात नांदेडच्या लोहा संघाने बाजी मारली.
अंध विद्यार्थ्यांच्या सुप्त कला-गुणांना वाव मिळावा, यासाठी राष्ट्रीय अपंग कल्याण संस्थेकडून अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. आतापर्यंत २ अंध खेळाडू या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राला मिळाले आहेत. ही संस्था खेळाडूंना लागणार्या मूलभूत सुविधा पुरविण्याचे काम सातत्यानं करत आहे.
चिखलदरासारख्या दुर्गम भागात राज्यस्तरीय अंध क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याने अंध क्रिकेटपटूंनी आनंद व्यक्त केला. तसेच त्यांनी अशा प्रकारचे अंध क्रिकेट सामने शासनानेसुद्धा आयोजित करावे, अशी मागणीही केली.
हेही वाचा - आयसीसीचा नवा नियम : भारत, इंग्लंडसह ऑस्ट्रेलियाला बसणार फटका?
हेही वाचा - VIDEO : क्रिकेटला गालबोट, अंतिम सामन्यानंतर भारत-बांगलादेशचे खेळाडू भिडले