मँचेस्टर - वेस्ट इंडिज सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने मंगळवारी नेट्समध्ये सराव केला. त्यामुळे भुवनेश्वर पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे बोलले जात आहे. भुवनेश्वरच्या दुखपातीमुळे अफगाणिस्तान विरुध्दच्या सामन्यात मोहम्मद शमीला संघात घेण्यात आले होते. या सामन्यात शमीनेही चांगली गोलंदाजी करत शेवटच्या षटकात हॅट्रीक घेतली होती.
-
Look who's back in the nets 💪💪#TeamIndia #CWC19 pic.twitter.com/m8bqvHBwrn
— BCCI (@BCCI) June 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Look who's back in the nets 💪💪#TeamIndia #CWC19 pic.twitter.com/m8bqvHBwrn
— BCCI (@BCCI) June 25, 2019Look who's back in the nets 💪💪#TeamIndia #CWC19 pic.twitter.com/m8bqvHBwrn
— BCCI (@BCCI) June 25, 2019
पाकिस्तान विरुध्दच्या सामन्यात गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमार याचे स्नायू दुखावले होते. त्यामुळे भुवनेश्वर कुमार त्या सामन्यात गोलंदाजी करू शकला नाही. नंतर भुवनेश्वरची दुखापत गंभीर असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे अफगाणिस्तानच्या विरुध्दच्या सामन्यात शमीला संधी देण्यात आली होती.
शिवाय भुवीची दुखापत लक्षात घेता नेट्समध्ये गोलंदाजी करण्यासाठी बीसीसीआयने नवदीप सैनीला मँचेस्टरला बोलावून घेतले आहे. मात्र, भुवनेश्वरने नेट्समध्ये सराव करताना गोलंदाजी केली. त्यामुळे भुवी तंदुरुस्त असल्याची चर्चा आहे. भुवनेश्वर कुमार भारताचा प्रमुख गोलंदाज असून तो या स्पर्धेत खेळणे भारतासाठी महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे भुवी तंदुरुस्त झाल्यास भारतीय संघासाठी आनंदाची बातमी असणार आहे.