ETV Bharat / sports

स्टोक्सला आवडतात 'हे' ३ भारतीय युवा फलंदाज, ऋषभ पंतचा समावेश नाही

संजू सॅमसन, राहूल त्रिपाठी आणि पृथ्वी शॉ स्टोक्सचे आवडीचे भारतीय फलंदाज

बेन स्टोक्स
author img

By

Published : Apr 8, 2019, 7:55 PM IST

जयपूर - इंग्लंडचा आणि राजस्थानचा अष्ठपैलु खेळाडू बेन स्टोक्सने एक ट्विट करत आपल्याला आवडणाऱ्या ३ भारतीय युवा फलंदाजांची नावे सांगितली आहेत. या ३ खेळाडूंमध्ये स्टोक्सने स्वत: आयपीएलमध्ये खेळत असलेल्या राजस्थान रॉयल्सच्या २ फलंदाजांना तर दिल्ली कॅपिटल्सच्या एका युवा भारतीय फलंदाजाला स्थान दिले आहे.

स्टोक्सने राजस्थानच्या संजू सॅमसन आणि राहूल त्रिपाठीला तर दिल्लीच्या पृथ्वी शॉला आपल्या आवडीच्या भारतीय युवा फलंदाजांमध्ये स्थान दिले आहे. आयपीएलच्या बाराव्या मोसमात संजूने सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात शानदार शतक झळकावले होते. तर पृथ्वीने कोलकाताविरुद्ध ९९ धावांची खेळी केली होती. त्रिपाठीनेही राजस्थानसाठी गेल्या ४ सामन्यांमध्ये ८० धावा केल्या आहेत

स्टोक्सने केलेल्या ट्विटला उत्तर देताना त्याचाच संघसहकारी सॅम बिलिंग्सने अजुन एका युवा फंलदाजाच्या नावास पसंती दिली आहे. बिलिंग्सने भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतचे नाव सुचवले आहे.

Intro:Body:

SPO 4

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.