ETV Bharat / sports

MI vs RR : शतकानंतर बेन स्टोक्सचे मधलं बोट दाखवत सेलिब्रेशन, जाणून घ्या कारण...

बेन स्टोक्सचे वडील कॅन्सरशी झगडत आहेत. त्यांच्यावर न्यूझीलंडमध्ये उपचार सुरू आहेत. यामुळे बेन स्टोक्सने इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून माघार घेतली होती. तसेच तो आयपीएलमध्ये खेळणार की नाही, या बाबत संशाकता होती. पण, तो अखेर आयपीएल खेळण्यासाठी युएईमध्ये पोहोचला. त्याने मुंबईविरुद्धच्या सामन्यात तुफानी खेळी केली. शतकानंतर त्याने मधल बोट लपवून सेलिब्रेशन केले. त्याच्या या सेलिब्रेशनमागे एक भावनिक कारण आहे.

ben stokes dedicated his century to his father who is battling with brain cancer rr vs mi ipl 2020
MI vs RR : शतकानंतर बेन स्टोक्सचे मधलं बोट दाखवत सेलिब्रेशन, जाणून घ्या कारण...
author img

By

Published : Oct 26, 2020, 9:25 AM IST

अबुधाबी - बेन स्टोक्सच्या ६० चेंडूत नाबाद १०७ धावा आणि त्याने संजू सॅमसनसोबत केलेल्या तिसऱ्या गड्यासाठी १५२ धावांच्या भागीदारीच्या जोरावर राजस्थानने बलाढ्य मुंबईवर ८ गडी राखून विजय मिळवला. १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ मुंबईसमोर गुडघे टेकेल असाच सर्वांचा अंदाज होता. पण, निराशाजनक सुरुवातीनंतरही बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन यांनी तुफान फटकेबाजी करून राजस्थानला विजय मिळवून दिला. राजस्थानने या विजयासह आपले स्पर्धेतील आव्हान जीवंत ठेवले. दरम्यान, या सामन्यात स्टोक्सने शतकानंतर मधल बोट लपवून सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनचे गुपित समोर आले आहे.

बेन स्टोक्सचे वडील कॅन्सरशी झगडत आहेत. त्यांच्यावर न्यूझीलंडमध्ये उपचार सुरू आहेत. यामुळे बेन स्टोक्सने इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून माघार घेतली होती. तसेच तो आयपीएलमध्ये खेळणार की नाही, या बाबत संशाकता होती. पण, तो अखेर आयपीएल खेळण्यासाठी युएईमध्ये पोहोचला. त्याने मुंबईविरुद्धच्या सामन्यात तुफानी खेळी केली. शतकानंतर त्याने मधल बोट लपवून सेलिब्रेशन केले. त्याच्या या सेलिब्रेशनमागे एक भावनिक कारण आहे.

काय आहे स्टोक्सच्या त्या सेलिब्रेशनचे गुपित -

स्टोक्सचे वडील रग्बीपटू होते. १९८० मध्ये रग्बी सामन्यात त्यांना त्यांच्या हाताच्या मधल्या बोटाचा वरचा भाग गमवावा लागला होता. त्यावेळी शस्त्रक्रिया करण्यासाठी पैसे नव्हते. स्टोक्सने मुंबईविरूद्ध झळकावलेले शतक त्यांना समर्पित केले. दरम्यान, याआधी स्टोक्सने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीतील विक्रमी कामगिरीनंतर असे सेलिब्रेशन केले होते.

स्टोक्सचे भन्नाट शतक -

मुंबईच्या १९६ धावांचा पाठलाग करताना राजस्थानची अवस्था एकवेळ २ बाद ४४ अशी केविलवाणी झाली होती. तेव्हा स्टोक्सने मोर्चा सांभाळत संजू सॅमसनसोबत विक्रमी भागिदारी केली. दोघांनी मुंबईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. स्टोक्सने ६० चेंडूत १४ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद १०७ धावांची खेळी केली. तर संजू ३१ चेंडूत ५४ धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी १८.२ षटकातच राजस्थानला विजय मिळवून दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.