ETV Bharat / sports

B'day Special : क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ५ गडी बाद करणारा पहिला भारतीय गोलंदाज - wickets

२०१६ आणि २०१७ च्या आयपीएल मौसमात त्याने सर्वाधिक गडी बाद करत पर्पल कॅपवर कब्जा केला होता.

भुवनेश्वरकुमार
author img

By

Published : Feb 5, 2019, 3:15 PM IST

मुंबई - भारतीय संघ सध्या सर्वात मजबूत संघ मानला जात आहे. कारण त्यांच्याकडे एकापेक्षा एक वेगवान गोलंदाज आहेत. त्यापैकीच दोन्ही बाजूने स्विंग करत फलंदाजाच्या मनात धडकी भरणाऱ्या भुवनेश्वर कुमारने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात छाप सोडली आहे. नकलबॉल ही त्याची खासियत आहे. भुवनेश्वर कुमार, आज त्याचा २९ वा वाढदिवस साजरा करत आहे.

२०१२ मध्ये क्रिकेटची सुरुवात करणाऱ्या करणाऱ्या या वेगवान गोलंदाजाच्या आयुष्यात अनेकदा चढउतार आले. २००८-०९ मध्ये रणजीच्या अंतिम सामन्यात उत्तरप्रदेश संघाकडून मुंबई विरुद्ध हैदराबादमध्ये खेळताना सचिन तेंडुलकरला शून्यावर बाद केल्यानंतर अचानक प्रकाश झोतात आला होता. विशेष म्हणजे सचिन स्थानिक सामन्यात पहिल्यांदाच शून्यावर बाद झाला होता. इतकी विशेष कामगिरी करूनही भूवीच्या संघाला सामना जिंकता आला नाही.

भूवीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात शानदार झाली. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात आणि पहिल्याच चेंडूत त्याने विकेट घेतली. त्या सामन्यात त्याने ९ षटकात सलग ३ षटके निर्धाव टाकत २७ धावा देत २ गडी बाद केले. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात त्याने बोल्ड विकेट घेतले आहेत. नासिर जमशेद, मोहम्मद हफीज आणि डेविड वॉर्नर हे फलंदाज त्याचे शिकार बनले.

undefined

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ५ बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. भूवीच्यानंतर युझवेंद्र चहल तिन्ही प्रकारात ५ गडी बाद करत दुसरा खेळाडू ठरला. आयपीएलमध्ये सर्वात जास्त गडी बाद करण्यात सहाव्या क्रमांकावर आहे. त्याने १०२ सामन्यात १२० गडी बाद केले आहेत. २०१६ आणि २०१७ च्या आयपीएल मौसमात त्याने सर्वाधिक गडी बाद करत पर्पल कॅपवर कब्जा केला होता.

Intro:Body:

B'day Special : क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ५ गडी बाद करणारा पहिला भारतीय गोलंदाज

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.