ETV Bharat / sports

वयासंबंधित फसवणूक करणाऱ्या खेळाडूंवर बीसीसीआय करणार मोठी कारवाई

author img

By

Published : Aug 3, 2020, 3:31 PM IST

नवीन धोरणानुसार, जर खेळाडूने वयसंबंधित चुकीची माहिती दिली किंवा वयचोरी केली तर बीसीसीआय त्याच्यावर दोन वर्षांसाठी बंदी घालू शकते. या नवीन धोरणांतर्गत, जो खेळाडू आपली बनावट कागदपत्रे सादर करेल आणि आपल्या जन्माच्या तारखेमध्ये छेडछाड केलेले कबूल करेल, अशा खेळाडूला प्रतिबंधित केले जाणार नाही. त्याने योग्य वय सांगितले, तर त्याला स्पर्धांमध्ये खेळण्याची परवानगी दिली जाईल.

BCCI to impose two year ban on players who commit age-related fraud
वय-संबंधित फसवणूक करणाऱ्या खेळाडूंवर बीसीसीआय करणार मोठी कारवाई

नवी दिल्ली - बीसीसीआयने स्थानिक क्रिकेटमधील वयाशी संबंधित अडचणींबाबत नवीन धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. 2020-21 हंगामात बीसीसीआयच्या सर्व वयोगटातील स्पर्धांमध्ये भाग घेत असलेल्या खेळाडूंना हे नवीन नियम लागू होतील.

नवीन धोरणानुसार, जर खेळाडूने वयसंबंधित चुकीची माहिती दिली किंवा वयचोरी केली, तर बीसीसीआय त्याच्यावर दोन वर्षांसाठी बंदी घालू शकते. या नवीन धोरणांतर्गत, जो खेळाडू आपली बनावट कागदपत्रे सादर करेल आणि आपल्या जन्माच्या तारखेमध्ये छेडछाड केलेले कबूल करेल, अशा खेळाडूला प्रतिबंधित केले जाणार नाही. त्याने योग्य वय सांगितले, तर त्याला स्पर्धांमध्ये खेळण्याची परवानगी दिली जाईल.

खेळाडूला त्याचे स्वाक्षरी केलेले पत्र/ईमेल पाठवावे लागेल, ज्यासह त्याला संबंधित विभागाकडून पडताळणीसह 15 सप्टेंबरपर्यंत त्याच्या वास्तविक जन्माच्या तारखेची कागदपत्रे सादर करावी लागतील.

नोंदणीकृत खेळाडू सत्य सांगत नसेल आणि त्याची कागदपत्रे बनावट असल्याचे आढळल्यास त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात येईल. दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर अशा खेळाडूंना बीसीसीआय वयोगटातील स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही.

बीसीसीआय 16 वर्षांखाली स्पर्धेत केवळ 14 ते 16 वयोगटातील खेळाडू सहभागी होऊ शकतात. बोर्डाने असेही म्हटले आहे, की वयाशी संबंधित अडचणींबद्दल माहिती देण्यासाठी एक हेल्पलाइन नंबरही तयार केला गेला आहे.

याविषयी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला, "आम्ही सर्व वयोगटात एक समान व्यासपीठ उपलब्ध करून देण्यास वचनबद्ध आहोत. बीसीसीआय वयाशी संबंधित प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठी पावले उचलत आहे आणि आता येत्या हंगामासाठी त्यांनी आणखी कडक नियम लागू केले आहेत. जे स्वत:ची चूक मान्य करणार नाहीत त्यांना कठोर शिक्षा केली जाईल."

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.