ETV Bharat / sports

यंदा आयपीएल होण्याची शक्यता - बीसीसीआय अधिकारी - bcci on ipl 2020 news

एका वृत्तसंस्थेला बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले, ''कोरोनाव्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बोर्डाला अखेर ही स्पर्धा युएई किंवा श्रीलंका येथे नेण्यास भाग पाडले जात आहे. आम्ही अद्याप जागेबाबत (यजमानपदाबद्दल) निर्णय घेतलेला नाही. परंतु यावर्षी इंडियन प्रीमियर लीग होण्याची शक्यता आहे. भारतातील परिस्थिती इतकी अनुकूल नाही की संघ एक-दोन ठिकाणी येऊन सुरक्षित वातावरणात खेळू शकतील. खेळाडूंसाठी तसेच सर्वसामान्यांसाठी बंद दाराच्या आड खेळ खेळवला जाऊ शकतो.''

bcci says ipl likely to happen uae or srilanka
यंदा आयपीएल होण्याची शक्यता - बीसीसीआय अधिकारी
author img

By

Published : Jul 3, 2020, 12:16 PM IST

मुंबई - इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) यंदाच्या 13 व्या हंगामाची सर्व शक्यता बीसीसीआय पडताळून पाहत आहे. अशातच, युएई आणि श्रीलंका या लीगच्या यजमान पदासाठी स्पर्धेत उतरले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआयने यंदाची आयपीएल स्पर्धा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आयोजित करण्यासाठी पसंती दर्शवली आहे. मात्र, या काळात होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेबाबत आयसीसीने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

एका वृत्तसंस्थेला बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले, ''कोरोनाव्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बोर्डाला अखेर ही स्पर्धा युएई किंवा श्रीलंका येथे नेण्यास भाग पाडले जात आहे. आम्ही अद्याप जागेबाबत (यजमानपदाबद्दल) निर्णय घेतलेला नाही. परंतु यावर्षी इंडियन प्रीमियर लीग होण्याची शक्यता आहे. भारतातील परिस्थिती इतकी अनुकूल नाही की संघ एक-दोन ठिकाणी येऊन सुरक्षित वातावरणात खेळू शकतील. खेळाडूंसाठी तसेच सर्वसामान्यांसाठी बंद दाराच्या आड खेळ खेळवला जाऊ शकतो.''

ते पुढे म्हणाले, ''ऑक्टोबरपर्यंत मुंबईत परिस्थिती नियंत्रणात राहिल्यास येथे चार उच्चवर्गीय फ्लडलाइट मैदान आयपीएलसाठी उपलब्ध आहेत. बीसीसीआय, ब्रॉडकास्टर्ससाठी लॉजिस्टिक (स्टार स्पोर्ट्स), बायो-बबलची देखभाल करणे, सर्वकाही सुरळीतपणे नियोजित केले जाऊ शकते.''

मुंबईत कोरोनाचे 31 हजार रुग्ण आहेत. तर, कोरोनाची वाईट परिस्थिती असलेले मुंबई हे भारतातील चौथे शहर आहे. वानखेडे, ब्रेबॉर्न आणि डी.वाय.पाटील असे तीन स्टेडियम मुंबईत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.