मुंबई - पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्लानंतर क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने (सीसीआय) क्लबमधून पाकिस्तानी खेळाडूंचे फोटो हटवले होते. सीसीआयने पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो काढून याची सुरुवात केली होती. आता, बीसीसीआयनेही यावर पावले उचलतान पाकिस्तानच्या खेळाडूंचे फोटो काढून टाकले आहेत.
बीसीसीआयच्या कार्यालयात माजी भारतीय कर्णधार किरण मोरे यांच्यासोबत पाकिस्तानच्या जावेद मियादादचा फोटो आहे. १९९२ साली विश्वकरंडकातल्या या फोटोत किरण मोरे मियादादला उड्या मारुन चिडवत आहेत. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुर्शरफसोबत भारतीय संघाचा दुसरा फोटो आहे. बीसीसीआयने हे दोन्ही फोटो काढून टाकले आहेत.