कोलकाता - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) तेराव्या हंगामासाठी बुधवारी दुबईला रवाना झाला आहे. यापूर्वी, आयपीएलचे वेळापत्रकही जाहीर झाले असून या हंगामातील लीगचा पहिला सामना गतविजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अबुधाबी येथे १९ सप्टेंबर रोजी होईल.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
गांगुलीने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात त्याने आयपीएलसाठी दुबईला रवाना होत असल्याचे सांगितले आहे. ''गेल्या सहा महिन्यात माझा पहिला विमानप्रवास. जीवन बदलले आहे", असे गांगुलीने आपल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले. कोरोनामुळे आयपीएलचा यंदाचा हंगाम या वेळी १९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) खेळवला जाईल.
आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यापूर्वीच दुबईला पोहोचले आहेत. आयपीएलचे सामने यूएईच्या तीन शहरांमध्ये दुबई, अबू धाबी आणि शारजाह येथे खेळले जातील. या तीन शहरांपैकी दुबई सर्वाधिक २४ सामन्यांचे आयोजन करेल.
त्याचबरोबर अबूधाबीमध्ये २० सामने खेळले जातील. शारजाहमध्ये किमान १२ सामने खेळले जातील. बीसीसीआयने मात्र प्ले ऑफ आणि अंतिम सामन्यांच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत.