नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने स्विच हिट फटक्याला पाठिंबा दर्शविला आहे. क्रिकेटमधील स्विच हिट फटका हा गोलंदाजांचा अपमान असल्याच्या चर्चा समोर येत होत्या. आता गांगुलीने आपले मत मांडले आहे.
हेही वाचा - बेन स्टोक्सच्या वडिलांचे निधन, कॅन्सरविरुद्धची झुंज संपली
गांगुली म्हणाला, "क्रिकेटने बरीच प्रगती केली आहे, त्यामुळे आधुनिक शतकातील फलंदाजांकडून अशा प्रकारचे फटके आपण हिरावून घेऊ शकत नाही. असे धाडसी फटके खेळण्यासाठी आपल्याला धैर्य व सामर्थ्याची आवश्यकता आहे. तसेच पायांची हालचाल आणि वेळ अशा गोष्टींचीही आवश्यकता आहे. केव्हिन पीटरसनने पहिल्यांदा हा फटका खेळला. त्यानंतर वॉर्नरचे नाव येते. जर तुम्ही चांगले खेळत असाल तर हा खरोखर एक छान फटका आहे. "
इंग्लंडचा माजी कर्णधार पीटरसनने २०१२मध्ये एका कसोटी सामन्यादरम्यान असे बरेच फटके खेळले होते. या फटक्याला श्रीलंकेने विरोध केला होता. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपल यांनी असे फटके गोलंदाजांसाठी चांगले नसल्याचे म्हटले आहे.