मुंबई - कोरोनोव्हायरसमुळे ऑस्ट्रेलियाने आपली सीमा ३० सप्टेंबरपर्यंत बंद केली आहे. परंतु ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वकरंडक स्पर्धा आणि वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या भारताविरूद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया उत्सुक आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) चे प्रमुख केव्हिन रॉबर्ट्स म्हणाले, की भारताने येथे येऊन चार किंवा पाच कसोटी सामने खेळले पाहिजेत. पंरतू, या मालिकेसाठी बीसीसीआय अद्याप तयार नाही.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे, की हा निर्णय योग्य वेळी घेण्यात येईल आणि यावेळी यासंदर्भात कोणतेही धोरण तयार करणे फार घाईचे ठरेल.
“ऑस्ट्रेलियामध्ये आम्ही वर्षाच्या अखेरीस पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहोत, याबद्दल काहीही बोलणे घाईचे ठरेल. सद्य परिस्थिती आम्हाला एका वेळी एका चेंडूवर लक्ष केंद्रित करावे लागेल. आता परिस्थिती अशी नाही की आपण सात किंवा आठ महिन्यांनंतर एखाद्या गोष्टीबद्दल करू शकतो. ऑक्टोबरनंतर परिस्थिती काय आहे हे कोणाला माहित आहे? परिस्थिती कशी होईल हे आपण पाहू”, असे या अधिकाऱ्याने सांगितले आहे.