ढाका - बांगलादेशमध्ये होणाऱ्या आशिया इलेव्हन आणि वर्ल्ड इलेव्हन यांच्यातील दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर झाले आहेत. आशिया-इलेव्हन संघात कर्णधार विराट कोहली, केएल राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि ऋषभ पंत या भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा - जिथे क्रिकेटचा देवही होतो नतमस्तक.. विक्रमांचा बादशहा, 'नाईटहूड' आणि बरंच काही..
मीडिया रिपोर्टनुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतीय कर्णधार विराट कोहलीला एका सामन्यासाठी संघात समाविष्ट केले आहे. विराटच्या उपलब्धतेवर त्याचे संघातील स्थान अवलंबून असेल. बीसीसीआयने अद्याप याची पुष्टी केलेली नाही. तसेच भारतीय खेळाडूंपैकी राहुल फक्त एका सामन्यासाठी उपलब्ध असेल. आशिया इलेव्हन संघामध्ये एकाही पाकिस्तानी खेळाडूला स्थान दिलेले नाही.
बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबूर रहमान यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त आशिया-इलेव्हन आणि वर्ल्ड इलेव्हन यांच्यात दोन टी-२० सामने होणार असून हे सामने १८ ते २१ मार्च रोजी खेळवले जातील.
दोन्ही संघ -
आशिया इलेव्हन - विराट कोहली, केएल राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, लिटन दास, तमिम इक्बाल, मुश्फिकुर रहीम, थिसारा परेरा, राशिद खान, मुस्तफिजुर रहमान, संदीप लामिछाने, लसिथ मलिंगा, मुजीब उर रहमान.
वर्ल्ड इलेव्हन - अॅलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्टो, आदिल राशिद, ख्रिस गेल, निकोलस पूरन, केरॉन पोलार्ड, शेल्डन कॉट्रेल, फाफ डुप्लेसी, लुंगी एनगिडी, रॉस टेलर, मिशेल मॅक्लनघन, अँड्र्यू टाय.