मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ यावर्षी होणाऱया विश्वकरंडक स्पर्धेला मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकांउटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तो फंलदाजीचा सराव करताना दिसत आहे.
स्मिथने शेअर केलेल्या व्हिडिओत लिहीले की, माझ्या कोपऱ्याला झालेली दुखापत आता बरी झाली आहे. बांगलादेश प्रिमीयर लीगमध्ये खेळताना एका सामन्यात स्टीव्ह स्मिथला कोपऱ्याला दुखापत झाल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे, तो विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत तंदुरुस्त होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र स्मिथ आता पूर्णपणे बरा झाल्याने विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनीधीत्व करण्यास पूर्णपणे तयार आहे.
मार्च २०१८ मध्ये चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी बंदी झेलत असलेला स्मिथवरील क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घातलेली १ वर्षासाठीची बंदी २९ मार्चला या संपणार आहे. याच दरम्यान ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तानविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. त्यामुळे या मालिकेत त्यांच्या पुनरागमनाची आहे.