ETV Bharat / sports

महिला क्रिकेटपटूचे लग्नापूर्वी भन्नाट फोटोशूट..पाहा फोटो - womens cricketer photoshoot

संजीदा इस्लामने क्रिकेटच्या खेळपट्टीवर लग्नापूर्वीचे फोटोशूट केले आहे. तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंमध्ये संजीदाने खेळपट्टीवर नारंगी रंगाची साडी परिधान केली आहे.

Bangladeshi womens cricketer sanjida islam does wedding photoshoot on cricket pitch
महिला क्रिकेटपटूचे लग्नापूर्वी भन्नाट फोटोशूट..पाहा फोटो
author img

By

Published : Oct 21, 2020, 3:58 PM IST

नवी दिल्ली - आजच्या पिढीमध्ये लग्नापूर्वी फोटोशूट करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. विवध भन्नाट कल्पना डोक्यात ठेऊन हे फोटोशूट केले जाते. बांगलादेशची महिला क्रिकेटपटू संजीदा इस्लामनेही असे एक भन्नाट फोटोशूट केले असून तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

संजीदा इस्लामने क्रिकेटच्या खेळपट्टीवर लग्नापूर्वीचे फोटोशूट केले आहे. तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंमध्ये संजीदाने खेळपट्टीवर नारंगी रंगाची साडी परिधान केली आहे. शिवाय, तिने सुंदर दागिनेही परिधान केले आहेत. संजीदाने प्रथम श्रेणी क्रिकेटपटू मिम मोसादेकशी लग्न केले.

आयसीसीनेही संजीदाच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. संजीदाने ऑगस्ट २०१२मध्ये आयर्लंडविरुद्ध टी-२० सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २०१८मध्ये आशिया चषक टी-२० स्पर्धेचे विजेतेपद जिंकलेल्या संघाचा संजीदा भाग होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.