ETV Bharat / sports

Cricket World Cup : बांगलादेश-श्रीलंका सामन्यात पावसाची जोरदार बॅटींग, सामना रद्द

सामना रद्द झाल्याने श्रीलंकेच्या खात्यात आता ४ गुण जमा झाले आहेत

author img

By

Published : Jun 11, 2019, 8:10 PM IST

बांगलादेश-श्रीलंका सामन्यात पावसाची जोरदार बॅटींग, सामना रद्द

ब्रिस्टॉल - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेतील आजचा बांगलादेश-श्रीलंका सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. या सामन्यात पावसाने जोरदार बॅटींग केल्याने नाणेफेक होऊ शकली नसल्याने एकही चेंडू न टाकता हा सामना रद्द करण्याची घोषणा आयसीसीकडून करण्यात आली आहे.

हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आला आहे. विश्वकरंडक २०१९ मध्ये यापूर्वी २ सामने पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आले होते. श्रीलंकेच्या संघाने या स्पर्धेत यापूर्वी ३ सामने खेळले होते. त्यातील एका सामन्यात त्यांना विजय मिळवण्यात यश आले आहे. तर एका सामन्यात पराभव झाला असून एक सामना पावसामुळे रद्द करण्यात होता. त्यामुळे श्रीलंकेच्या खात्यात आता ४ गुण जमा झाले आहेत.

गुणतालिका
गुणतालिका

हा सामना रद्द झाल्याने बांगलादेशकडे चार सामन्यांनंतर आता ३ गुण आहेत. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा धक्कादायक पराभव करणाऱ्या बांगलादेशला त्यानंतरच्या झालेल्या दोन्ही सामन्यात पराभवास सामोरे जावे लागले होते.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.