ETV Bharat / sports

संजय बांगर यांना बीसीबीकडून सल्लागारपदाची ऑफर; पण 'ही' ठरली अडचण

याविषयी चौधरी यांनी सांगितलं की, 'कसोटी क्रिकेटसाठी फलंदाजी सल्लागार या पदासाठी आम्ही संजय बांगर यांना काम करण्याची विनंती केली आहे. मात्र त्यांच्याकडून अजुनही उत्तर आलेले नाही.'

bangladesh cricket board approaches sanjay bangar batting consultant job
संजय बांगर यांना बीसीबीकडून सल्लागारपदाची ऑफर, पण 'ही' ठरली अडचण
author img

By

Published : Mar 18, 2020, 11:18 PM IST

ढाका - बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांना आपल्या कसोटी संघाचे फलंदाजी सल्लागार पद स्वीकारण्याची विनंती केली आहे. याची माहिती बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निजामुद्दीन चौधरी यांनी दिली. ते पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होते.

याविषयी चौधरी यांनी सांगितलं की, 'कसोटी क्रिकेटसाठी फलंदाजी सल्लागार या पदासाठी आम्ही संजय बांगर यांना काम करण्याची विनंती केली आहे. मात्र त्यांच्याकडून अजुनही उत्तर आलेले नाही.'

४७ वर्षीय बांगर बीसीबीच्या विनंती स्वीकारु शकत नाहीत. कारण बांगर यांचा स्टार स्पोर्ट्ससोबत दोन वर्षांचा करार आहे. याविषयी बांगर यांनी सांगितलं की, 'बीसीबीने सल्लागार पदाचा प्रस्ताव ठेवला होता. पण मी स्टारसोबत करारबद्ध आहे. पण, भविष्यात मला बांगलादेश संघासोबत काम करण्यास आवडेल.'

दरम्यान, भारतीय संघाचे माजी सलामीवीर संजय बांगर यांनी गेली अनेक वर्षे भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्य केलं आहे. पण इंग्लंड विश्वकरंडकातील संघाच्या अपयशानंतर बांगर यांना सपोर्ट स्टाफमधून डच्चू देण्यात आले. त्यांच्या जागी बीसीसीआयने आता विक्रम राठोड यांची नियुक्ती केली आहे. बांगर यांनी भारताकडून १२ कसोटी आणि १५ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

हेही वाचा - Corona Virus : BCCI कडे IPL साठी प्लॅन बी तयार, पण पाकिस्तान ठरतोय अडथळा

हेही वाचा - 'धोनी फिट असेल तर तो टीम इंडियासाठी हिट आहे'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.