ढाका - ''जिथे थांबलो होतो, तिथूनच सुरुवात करेन'', असे बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने म्हटले आहे. आयसीसीने भ्रष्टाचारविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल शाकिबला दोन वर्षांसाठी निलंबित केले आहे. त्याचे निलंबन 29 ऑक्टोबर 2020 रोजी संपेल.
शाकिब म्हणाला, ''प्रथम मला पुनरागमन करायचे आहे. चार-पाच महिन्यांनंतर मी परत येईन. त्याआधी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. माझ्यासाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे मी जिथे थांबलो होतो तिथूनच मला सुरुवात करायची आहे. माझ्यासाठी हे आव्हानात्मक असेल."
शाकिब अल हसनला बुकींनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र शाकिबने ही बाब आयसीसीला कळवली नाही. यामुळे आयसीसी नियमांचा भंग केल्याप्रकरणी शाकिबवर ही बंदी घालण्यात आली आहे.
2019 च्या विश्वकरंडक स्पर्धेत शाकिब उत्तम फॉर्मात होता. त्याने आठ डावांमध्ये 606 धावा केल्या आणि 11 बळीही घेतले. या स्पर्धेत त्याने दोन शतके आणि पाच अर्धशतके झळकावली होती.