नवी दिल्ली - बांगलादेश क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दोन वर्षांची बंदी घातली आहे. त्याने तीन आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याचे मान्य केले असून त्यानंतर आयसीसीने हा निर्णय घेतला. एकदिवसीय, टी-२० आणि कसोटी क्रिकेट अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे.
जानेवारी २०१८ मध्ये तिरंगी मालिकेदरम्यान (बांगलादेश, श्रीलंका आणि झिम्बाब्वे ) शाकिबला मॅच फिक्सिंगची ऑफर एका बुकीकडून मिळाली होती. याची माहिती त्याने आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली नाही.
याशिवाय त्याला २०१८ मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यातही फिक्सिंगची ऑफर होती. याचीही माहिती त्याने आयसीसीला दिली नाही. त्यामुळे शाकिबवर ही कारवाई करण्यात आली आहे. आयसीसीने ट्विट करत शाकिबवर बंदीची घोषणा केली.
-
BREAKING: Bangladesh captain and world No.1 ODI all-rounder Shakib Al Hasan has been banned for two years (one of those suspended), for failing to report corrupt approaches on numerous occasions.https://t.co/depJ2VHSne
— ICC (@ICC) October 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">BREAKING: Bangladesh captain and world No.1 ODI all-rounder Shakib Al Hasan has been banned for two years (one of those suspended), for failing to report corrupt approaches on numerous occasions.https://t.co/depJ2VHSne
— ICC (@ICC) October 29, 2019BREAKING: Bangladesh captain and world No.1 ODI all-rounder Shakib Al Hasan has been banned for two years (one of those suspended), for failing to report corrupt approaches on numerous occasions.https://t.co/depJ2VHSne
— ICC (@ICC) October 29, 2019
मिळालेल्या माहितीनुसार, शाकिब २९ ऑक्टोबर २०२० नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. या बंदीविषयी शकिब म्हणाला, 'ज्या खेळावर मी मनापासून प्रेम केले, त्यापासून दोन वर्ष दूर रहावे लागणार असल्याने खूप निराश आहे, पण मी माझी चूक मान्य करतो.'
-
Read the full media release here ➡️ https://t.co/oNrhhE33NH pic.twitter.com/2gFpBStSd3
— ICC (@ICC) October 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Read the full media release here ➡️ https://t.co/oNrhhE33NH pic.twitter.com/2gFpBStSd3
— ICC (@ICC) October 29, 2019Read the full media release here ➡️ https://t.co/oNrhhE33NH pic.twitter.com/2gFpBStSd3
— ICC (@ICC) October 29, 2019
दरम्यान, शाकिबवर बंदीची कारवाई झाल्याने बांगलादेश संघ अडचणीत सापडला आहे. बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात बांगलादेशच्या एकदिवसीय आणि टी २० कर्णधार संघाची धुरा शाकिबकडे होती. त्याशिवाय एकदिवसीय जागतिक क्रमवारीत तो अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी आहे.
हेही वाचा - 'कॅप्टन' विराट कोहली दहशतवाद्यांच्या निशाण्यावर...
हेही वाचा - सौरव गांगुलींच्या जबराट निर्णयाने प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना येणार 'अच्छे दिन'